वाढता वाढता वाढे! राज्यातील 'या' शहरात सीएनजी थेट १२० रुपयांवर; देशात सर्वाधिक दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:45 PM2022-03-08T14:45:23+5:302022-03-08T14:45:43+5:30

सीएनजीच्या दरानं पेट्रोल, डिझेलला मागे टाकलं; सर्वसामान्यांचं बजेट बिघडलं

at 120 per kg cng costs more than petrol and diesel in nagpur | वाढता वाढता वाढे! राज्यातील 'या' शहरात सीएनजी थेट १२० रुपयांवर; देशात सर्वाधिक दर

वाढता वाढता वाढे! राज्यातील 'या' शहरात सीएनजी थेट १२० रुपयांवर; देशात सर्वाधिक दर

Next

नागपूर: उपराजधानी नागपुरात सीएनजीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. नागपुरात एक किलो सीएनजीसाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत. परवापर्यंत किलोभर सीएनजी १०० रुपयांना उपलब्ध होता. त्यात आता एका दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमत कमी असते. मात्र आता सीएनजीच्या दरांनी पेट्रोल, डिझेललादेखील मागे टाकलं आहे. सीएनजी स्वस्त असल्यानं त्यावर आधारित वाहनं खरेदी करणाऱ्यांना दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच महागाई वाढलेली असताना आता त्यात सीएनजीची भर पडली आहे. 

नागपुरात सीएनजीचे तीनच पंप आहेत. ते रॉमेट कंपनीचे आहेत. तिन्ही पंपांवर सीएनजीचे दर १२० रुपयांवर पोहोचले आहेत. नागपुरात सीएनजी आणण्यासाठी येणारा खर्च अधिक असल्याचं रॉमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Web Title: at 120 per kg cng costs more than petrol and diesel in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.