अट्टल चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:19+5:302021-05-22T04:09:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : कुही-वडाेदा मार्गावरील सावळी गावाजवळील बंद असलेल्या कंपनीच्या आवारात चाेरी करीत ट्रान्स्फाॅर्मरमधील साहित्य, इलेक्ट्रिक माेटार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : कुही-वडाेदा मार्गावरील सावळी गावाजवळील बंद असलेल्या कंपनीच्या आवारात चाेरी करीत ट्रान्स्फाॅर्मरमधील साहित्य, इलेक्ट्रिक माेटार व इतर वस्तू चाेरून नेणाऱ्या पाच अट्टल चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून वाहन व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये अजय मुरलीधर शेबे (२३, रा. वडाेदा, ता. कामठी), रवी बाेंडा प्रजापती (४२, रा. चित्रशाळा नगर, कळमना वस्ती, नागपूर), राकेश धर्मपाल प्रजापती (४७, रा. चित्रशाळा नगर, कळमना वस्ती, नागपूर), अतिक रफिक खान (२९, रा. लेंडे नगर, नागपूर) व गंगा श्रीकिशनलाल शाहू (४५, रा. गणाेबा वाडी, कमाल चाैक, नागपूर) यांचा समावेश आहे. रवी प्रजापती हा या टाेळीचा प्रमुख व चाेरीचा मुख्य सूत्रधार आहे. अरविंदकुमार देवकरण ठक्कर (रा. वर्धमान नगर, नागपूर) यांची सावळी शिवारात कंपनी असून, ती मागील काही दिवसांपासूून बंद आहे.
दरम्यान, या चाेरट्यांनी २१ मार्चच्या मध्यरात्री त्या कंपनीच्या आवारात प्रवेश केला आणि तिथून विविध साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच अरविंदकुमार ठक्कर यांनी कुही पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. कुही पाेलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेचा समांतर तपास करायला सुरुवात केली. या चाेरीत रवी प्रजापतीचा सहभाग असल्याचे तसेच त्याचा साथीदार अजय शेबे याने वडाेदा शिवारात चाेरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी वडाेदा (ता. कामठी) शिवारातून शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितल्याने पाेलिसांनी इतरांनाही अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे व साहेबराव बहाळे, विनाेद काळे, वीरेंद्र नरड, शैलेश यादव, सत्यशील काेठारे, अरविंद भगत, प्रणय बनाफर यांच्या पथकाने केली.
...
शिवगंगा राेलिंग मिलमधील चाेरी
या चाेरट्यांकडून चार लाख रुपयांचे एमएच-३१/डीएस-१०८३ क्रमांकाचे चारचाकी मालवाहू वाहन, ३० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा, ११,४०० रुपयांच्या लाेखंडी प्लेट, चार हजार रुपयांची केबल, १०,८०० रुपयांच्या ॲल्युमिनियम तारा असा एकूण ४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. या टाेळीने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवगंगा राेलिंग मिलमध्ये चाेरी केल्याचे कबूल केले असून, त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता अनिल जिट्टावार यांनी व्यक्त केली आहे.