अट्टल चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:16+5:302021-09-05T04:13:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : येरखेडा (ता. कामठी) येथील बीबी काॅलनीतील घरफाेडी प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : येरखेडा (ता. कामठी) येथील बीबी काॅलनीतील घरफाेडी प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजेच्या सुमारास तीन चाेरट्यांना येरखेडा येथून अटक केली. आराेपींमध्ये दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार ९५० रुपये किमतीचा चाेरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली.
या प्रकरणात शेख अक्रम शेख अब्दुल (२०, रा. बीबी कॉलनी, येरखेडा, ता. कामठी) यास अटक करण्यात आली असून, दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. शाहीद अब्दुल वहीद खान (३७, रा. बीबी कॉलनी, येरखेडा) हे २५ जुलैला कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्यांनी त्यांच्या घरी घरफाेडी करीत लॅपटॉप, घड्याळ, कॅमेरा, सोन्या-चांदीचे दागिने व ५२ हजार रुपये राेख आदी ऐवज चाेरून नेला हाेता. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले.
ही चाेरी शेख अक्रम शेख अब्दुलने केल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी शुक्रवारी रात्री सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी अन्य दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार ९५० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली.
ही कारवाई दुय्यम पाेलीस निरीक्षक विजय काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक श्याम वारंगे, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, प्रमोद वाघ, अनिल बाळराजे, मनोहर राऊत, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, नीलेश यादव, ललित शेंडे, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली.
...
पाच दिवसांची पाेलीस काेठडी
पाेलिसांनी दाेन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांची नागपूर शहरातील बालसुधारगृहात रवानगी केली, तर आराेपी शेख अक्रम शेख अब्दुल यास शनिवारी (दि. ४) कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची अर्थात बुधवारपर्यंत (दि. ८) पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. या चाेरट्यांकडून घरफाेडी व चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.