काचूरवाहीच्या उपसरपंचपदी अतकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:41+5:302021-04-14T04:08:41+5:30
रामटेक : काचूरवाही-खाेडगाव गट ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक साेमवारी (दि. १२) घेण्यात आली. यात शिशुपाल अतकरे यांनी पाच मतांनी विजय ...
रामटेक : काचूरवाही-खाेडगाव गट ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक साेमवारी (दि. १२) घेण्यात आली. यात शिशुपाल अतकरे यांनी पाच मतांनी विजय संपादन केल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
उपसरपंचपदासाठी शिशुपाल अतकरे व अजय सहारे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले हाेते. यात शिशुपाल अतकरे यांनी अजय सहारे यांचा पाच मतांनी पराभव केला. अतकरे यांना आठ तर सहारे यांना तीन मते मिळाली. या ग्रामपंचायतची निवडणूक अडीच वर्षापूर्वी पार पडली हाेती. त्यावेळी कल्पना नाटकर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली हाेती. ठरल्याप्रमाणे त्यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले हाेते. त्यामुळे ही पाेटनिवडणूक घेण्यात आली असून, त्यात शिशुपाल अतकरे यांनी विजय संपादन करीत बाजी मारली. या निवडणुकीच्या वेळी सरपंच शैलेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य शिवा इवनाते, मनोज सहारे, नरेंद्र बावनकुळे, शालू टेकाम, कल्पना नाटकर, लंका अडकणे, राजश्री साकौरे, सुलोचना मोहनकार, चंदा कोठेकार, ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते. निवडणुकीचा निकाल जाहीर हाेताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लाेष केला.