नागपूर ग्रामीण भागात गॅस कटरने एटीएम कापून लाखो रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:03 AM2017-11-30T11:03:45+5:302017-11-30T11:07:50+5:30

चोरट्याने एटीएम मशीन गॅस कटरने कापून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना येथील हिंगणा भागातील डोंगरगाव येथे मंगळवारी रात्री घडली.

ATM cut by the gas cutter and lakhs of rupees stolen in rural Nagpur | नागपूर ग्रामीण भागात गॅस कटरने एटीएम कापून लाखो रुपये लंपास

नागपूर ग्रामीण भागात गॅस कटरने एटीएम कापून लाखो रुपये लंपास

Next
ठळक मुद्दे१० लाखांहून अधिक रोकड पळविलीडोंगरगावातील प्रकार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला स्प्रे

आॅनलाईन लोकमत
नागपूर:
सदर एटीएम सेंटर हे बँक आॅफ इंडियाचे आहे. डोंगरगाव-गुमगाव रोडवर बँक आॅफ इंडियाची शाखा असून तेथून काही अंतरावरच सुरेश धुर्वे यांच्याकडे एका खोलीमध्ये एटीएम सेंटर आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपी एटीएम सेंटरवर आला. लगेच त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून रेकॉर्डिंग बंद केले. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडली. त्यातील लाखो रुपये काढून तो पसार झाला.
चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे, उपनिरीक्षक धानोरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख हे दाखल होऊन पंचनामा केला . याबाबत एटीएम सेंटर चालविणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र वसाखेत्रे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहे.

सुरक्षा रक्षकाविना एटीएम
डोंगरगाव येथील एटीएम सेंटरची तोडफोड करून त्यातील लाखो रुपये घेऊन चोरटा पसार झाला. तक्रारदार व्यवस्थापक वसाखेत्रे यांच्यानुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर एटीएम मशीनमध्ये १० लाख ७७ हजार रुपये होते. त्यानंतर तेथून किती रक्कम ग्राहकांनी काढली, याचा हिशेब सुरू आहे. मात्र असे असले तरी त्यात किमान साधारणत: १० लाख रुपये असावेत, असा अंदाज आहे. बहुतांश एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक तैनात असतात. मात्र डोंगरगाव येथील चोरी झालेल्या एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नव्हता. त्यामुळे आरामात गॅस कटरने एटीएम कापून त्यातून रोख लंपास केली. त्यामुळे एटीएम सेंटरवर पाळत ठेवणाराच कुणीतरी असावा, अशी शक्यता अधिक आहे.

Web Title: ATM cut by the gas cutter and lakhs of rupees stolen in rural Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.