यूट्युब व्हिडिओ पाहून लावला 'एटीएम'ला कटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 11:20 AM2021-10-03T11:20:21+5:302021-10-03T11:23:18+5:30

आरोपींनी एटीएम कसे फोडायचे अन् रक्कम कशी काढायची याबाबत युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी एटीएममध्ये शिरले. परंतु पोलिसांनी वेळीच रंगेहाथ जेरबंद करून त्या तिघांचा डाव उधळला. 

atm robbery from wtching youtube video | यूट्युब व्हिडिओ पाहून लावला 'एटीएम'ला कटर

यूट्युब व्हिडिओ पाहून लावला 'एटीएम'ला कटर

Next
ठळक मुद्देत्रिकूट जेरबंद : सदरच्या मोहननगरातील घटना

नागपूर : एटीएम फोडत असलेल्या एका त्रिकुटाला सदर पोलिसांनी घटनास्थळी रंगेहात पकडले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहन नगरात ही घटना घडली.

आरोपींनी एटीएम कसे फोडायचे अन् रक्कम कशी काढायची याबाबत युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी एटीएममध्ये शिरले. मोठी रक्कम मशीनमध्ये असेल असा त्यांना विश्वास होता. ती नेण्यासाठी भलीमोठी बॅगही सोबत आणली. परंतु पोलिसांनी वेळीच रंगेहाथ जेरबंद करून त्या तिघांचा डाव उधळला. 

सदरच्या मोहन नगर भागातील भीमसेन चौकातील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले जात असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना शुक्रवारी पहाटे ३ वाजता कळली. यावेळी त्या नाईट राऊंडवर शहरातील दुसऱ्या भागात होत्या. त्यांनी लगेच सदर पोलिसांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार विनोद चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. 

दरम्यान, एटीएममध्ये तीन आरोपी हातोडी, कटर आणि पेचकसच्या साहाय्याने एटीएम फोडून रक्कम काढण्याच्या तयारीत पोलिसांना दिसले. पोलीस पथकाने त्यांना घटनास्थळीच जेरबंद केले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे स्वप्निल रामचंद्र जांभुळकर ( वय ४३, रा. खलाशी लाईन मोहन नगर), प्रवीण नामदेवराव लव्हाले ( वय ४३, रा. म्हाळगी नगर, हुडकेश्वर) आणि आकाश धर्मेंद्र नाईक (वय ४६, रा. खलाशी लाईन, सदर) असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, मशीन, पेंचीस, चाकू, बॅग जप्त केली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाणे कलम ३७९,५११,४२७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: atm robbery from wtching youtube video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.