महानिर्मितीत वातावरण तापले
By admin | Published: February 26, 2017 03:02 AM2017-02-26T03:02:33+5:302017-02-26T03:02:33+5:30
ई-निविदा घोटाळा उघडकीस आल्यानंतर खापरखेडा वीज केंद्रातील वातावरण चांगलेच तापले आहे.
नागरिकांत भीतीचे वातावरण : खिडक्यांची तावदाने फुटली, भिंतींना गेले तडे
नांद : भिवापूर तालुक्यातील नांद-पिरावा परिसरात असलेल्या वेकोलिच्या खाणीतून ‘ब्लास्टिंग’ करून कोळसा काढला जातो. या ‘ब्लास्टिंग’ची तीव्रता अधिक असल्याने नांद येथील घरांना प्रचंड हादरे बसत असून, या हादऱ्यांमुळे काही घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. ‘ब्लास्टिंग’ने जमीन हलल्यागत होत असल्याने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात वेकोलिच्या ‘गोकुल’ खाणीला मागील वर्षापासून सुरुवात केली आहे. खाणीतील कोळसा बाहेर काढण्यासाठी रोज ‘ब्लास्टिंग’ केले जाते. पिरावा हे गाव खाणीच्या अगदी मध्यभागी आहे. या ‘ब्लास्टिंग’मुळे जमीन अक्षरश: हलत असल्याने नागरिक रोज ‘भूकंप’ अनुभवतात. परिणामी, पिरावाचे पुनर्वसन क्रमप्राप्त असताना पुनर्वसनासाठी वेकोलि प्रशासन नागरिकांना दीड वर्षंपासून झुलवत आहे. नांद या खाणीपासून अर्धा कि.मी. असून, १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. ‘ब्लास्टिंग’ची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नांदलाही हादरे बसतात.
नांद येथील बहुतांश घरांचे बांधकाम मातीचे आहे. त्यामुळे गावातील बहुतांश घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. घरांमधील भांडी खाली पडण्याचे प्रकार सामान्य झाले आहे. शुक्रवारी (दि. २४) दुपारी करण्यात आलेल्या तीन स्फोटामुळे जिल्हा परिषद सदस्य नंदा नारनवरे, रा. नांद यांच्या घराच्या खिडक्यांची तावदाने फुटलीत. या संदर्भात वेकोलिचे अधिकारी त्रिपाठी व ठाणेदार रवींद्र दुबे यांना माहिती देण्यात आल्याचे नंदा नारनवरे यांनी सांगितले. या समस्येमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)