बालिकेवर अत्याचार, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:35+5:302021-05-07T04:09:35+5:30
उमरेड : बालिकेला स्वत:च्या घरी नेऊन आराेपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उमरेड शहरात मंगळवारी (दि.५) उघडकीस आली. ...
उमरेड : बालिकेला स्वत:च्या घरी नेऊन आराेपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उमरेड शहरात मंगळवारी (दि.५) उघडकीस आली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.
जगदीश परदेशी राठाेड (३०, रा. अभ्यंकर चाैक, उमरेड) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने पीडित बालिकेच्या आईशी भांडण करून तिला मारहाण केली. दरम्यान, ती शेजारच्या घरी गेली असताना, आराेपीने तिच्या पाच वर्षीय बालिकेला स्वत:च्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून उमरेड पाेलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ अ, ब, ३७६ (२) फ, ज, ३२३, सहकलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.