मध्य प्रदेशातील तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:11+5:302021-03-20T04:07:11+5:30

आत्याने केला विश्वासघात : आरोपी गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाहुणी बनून आलेल्या तरुणीला आरोपी आत्याने ओळखीच्या इसमाच्या ...

Atrocities on a young woman in Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील तरुणीवर अत्याचार

मध्य प्रदेशातील तरुणीवर अत्याचार

Next

आत्याने केला विश्वासघात : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाहुणी बनून आलेल्या तरुणीला आरोपी आत्याने ओळखीच्या इसमाच्या हवाली केले, तर या आरोपीने तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड महिन्यांपूर्वी हे प्रकरण घडले. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेसह दोघांना अटक केली.

पीडित तरुणी १९ वर्षांची असून, ती मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तिची आत्या गिट्टीखदानमध्ये राहते. महिन्याभरापूर्वी तरुणी तिच्या आत्याकडे पाहुनी म्हणून आली होती. आरोपी महिलेकडे तिच्या ओळखीचा आरोपी शेख इस्राईल शेख हुसेन (वय ४४, रा. गौसिया कॉलनी) नेहमी येतो. तो टाइल्स विक्रेता आहे.

६ फेब्रुवारीला रात्री ८च्या सुमारास तो महिलेच्या घरी आला. यावेळी महिलेने पीडित तरुणीला त्याच्या हवाली केले आणि बाहेरून दाराची कडी लावून निघून गेली. तब्बल तीन तास आरोपीने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर पुढचे दोन दिवस असाच प्रकार चालला. हादरलेली तरुणी आपल्या गावी परत गेली. तिने तिच्या नातेवाइकांना हिम्मत करून हा प्रकार सांगितला. त्यांनी शिवनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र हे प्रकरण नागपुरात पडल्यामुळे त्यांनी ते तपासासाठी गिट्टीखदान पोलिसांना पाठविले. पीएसआय सावंत आणि एपीआय दत्ता पेंडकर यांनी लगेच धावपळ करून गुरुवारी या प्रकरणातील आरोपी इस्राईल तसेच त्याची साथीदार महिला या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा २१ मार्चपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.

या प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक अतिशय गरीब आहेत. जिच्या आश्रयाला पाठविले त्या आत्यानेच विश्वासघात केल्यामुळे या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे.

---

Web Title: Atrocities on a young woman in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.