वडेट्टीवार, धानोरकर यांच्या विरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा : महिला मोर्चातर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:53 PM2019-04-23T21:53:14+5:302019-04-23T21:57:36+5:30

राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आ. विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

'Atrocity' against Wadettawar, Dhanorkar: Women's Morcha agitation | वडेट्टीवार, धानोरकर यांच्या विरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा : महिला मोर्चातर्फे निदर्शने

वडेट्टीवार, धानोरकर यांच्या विरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा : महिला मोर्चातर्फे निदर्शने

Next
ठळक मुद्देराजुरा लैंगिक शोषण प्रकरणात भाजपा आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आ. विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास संविधान चौकात महिला मोर्चाच्या अध्यक्षा कीर्तीदा अजमेरा, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अर्चना डेहनकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्याचे निवेदन पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना यांना देण्यात आले. राजुरा येथील घटना घृणास्पद आहे. मात्र शासनाने या प्रकरणात त्वरित योग्य पाऊल उचलले आणि आरोपींना अटक केली. पीडित मुलींना न्याय व पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाला कॉंग्रेसतर्फे चुकीची दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे. शासकीय मदतीसाठी व पैशांच्या लोभापायी पीडितांच्या पालकांकडून पोलिसात तक्रार देण्यात येत आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार, बाळू धानोरकर व संस्थाचालक सुभाष धोटे यांनी केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आदिवासी व दलित समाजाचा अपमान केला आहे. आदिवासी महिला कधीही पैशांसाठी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. ही मानसिकता कॉंग्रेस नेत्यांची आहे. त्यामुळेच असे वक्तव्य करण्यात आले, असा आरोप अजमेरा यांनी केला. तिघांविरोधातही ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. यावेळी संध्या ठाकरे, सीमा ढोमणे , वंदना शर्मा , पूजा तिवारी, कंचन करमरकर, संगीता देशमुख, संगीता पाटील, अनिता मिश्रा, मंगला पाटील, महिमा दभरी, कल्पना पजारे, राणी रेड्डी, राजश्री दाउदखानी, ज्योति वर्मा इत्यादी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Web Title: 'Atrocity' against Wadettawar, Dhanorkar: Women's Morcha agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.