गुन्हेगारांवर तुटून पडा : नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:17 PM2019-05-08T22:17:35+5:302019-05-08T22:18:44+5:30

गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित मासिक गुन्हे बैठकीत ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Attack on criminals : The Police Commissioner's instructions to PSO | गुन्हेगारांवर तुटून पडा : नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश

गुन्हेगारांवर तुटून पडा : नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश

Next
ठळक मुद्देड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीम कडक करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित मासिक गुन्हे बैठकीत ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
ट्रान्सपोर्टर बॉबी माकन हत्याकांडानंतर शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गँगस्टर लिटील सरदारसह चार आरोपींना अटक केली आहे. त्याचा सहकारी मंजित वाडे फरार आहे. बॉबीच्या हत्याकांडात पाचपावलीतील गुन्हेगार आणि इप्पा गँगचा एक सदस्य आणि शहरातील एक चर्चित गँगस्टरचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना घटना घडण्याची वाट न पाहता गुन्हेगारांविरुद्ध स्वयंस्फूर्तीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ते म्हणाले, मोठे गुन्हेगार टोळी बनवून गुन्हे करीत असतात. अशा वेळी टोळीची माहिती एकत्र करावी. एमपीडीएच्या कारवाईला प्राधान्य द्यावे. तडीपार गुंडांना कुठल्याही परिस्थितीत शहरात घुसू देऊ नये. लुटमार करणाºया गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवावे. पोलिसांचे लक्ष हटताच गुन्हेगार चेन स्नॅचिंग व लुटमार करीत असतात. चेन स्नॅचिंगच्या घटनांनाही गांभीर्याने घ्यावे. चेन स्नॅचिंगप्रकरणी चोरीचा गुन्ह्याऐवजी लुटमारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले.
डॉ. उपाध्याय यांनी तहसील ठाणे परिसरातील गोळीबार चौकात झालेल्या चोरीच्या घटनेलाही गांभीर्याने घेत आरोपींचा पत्ता लावण्याचे निर्देश दिले. त्यांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीम आणखी कडक करण्याचे निर्देश दिले. वाहन चोरीच्या घटनांनाही गांभीर्याने घेण्यास सांगितले. अशा प्रकरणात तक्रारकर्त्यास मूळ कागदपत्र आणून दाखवण्याच्या नावावर टाइम पास केला जातो. इतक्या वेळात चोरीचे वाहन दुसऱ्या राज्यात पोहोचले. अशा प्रकरणात कार्यशाळा आयोजित करून पोलिसांचे मार्गदर्शन करण्यासही सांगितले.
रस्त्यांवर दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. दारुच्या नशेत क्षुल्लक वादातही हत्येसारखी गंभीर घटना घडत असते. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.
लाचखोरी सहन करणार नाही
लाच मागितल्याची तक्रार आल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. लाचेसाठी नागरिकांना त्रास देण्याची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते. पोलिसांच्या कार्यात सेवेची भावना असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Attack on criminals : The Police Commissioner's instructions to PSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.