पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

By योगेश पांडे | Published: April 17, 2023 05:07 PM2023-04-17T17:07:04+5:302023-04-17T17:07:33+5:30

Nagpur News जुन्या वादातून पोलिसांत तक्रार केल्याची गोष्ट डोक्यात ठेवून आरोपीने एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करत वार केले. यात तरुण जखमी झाला आहे.

Attacked with a sword out of anger for complaining to the police | पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

googlenewsNext

योगेश पांडे 
नागपूर : जुन्या वादातून पोलिसांत तक्रार केल्याची गोष्ट डोक्यात ठेवून आरोपीने एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करत वार केले. यात तरुण जखमी झाला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

निकेश शाहू (२३, फुकटनगर, पंजाब लाईन) असे आरोपीचे नाव आहे. खुशाल निखारे (३६, कुंदनलाल गुप्ता नगर) यांच्या पुतण्यासोबत निकेशचे अगोदर भांडण झाले होते. त्यावेळी खुशाल यांनी मध्यस्थी केली होती व पुतण्याला घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात निकेशविरोधात तक्रार केली होती. हा राग त्याच्या मनात होता. १६ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास खुशाल हे घराजवळ उभे असताना निकेश तेथे पोहोचला व शिवीगाळ करू लागला. त्याने काही कळायच्या आतच तलवार काढली व खुशाल यांच्या डोक्यावर वार केले. यात खुशाल जखमी झाले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून निकेश तेथून फरार झाला. नातेवाईकांनी खुशाल यांना जखमी अवस्थेत मेयो इस्पितळात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरून निकेशविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Attacked with a sword out of anger for complaining to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.