अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:19+5:302021-02-21T04:15:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : घरफाेडी करून साहित्य चाेरून नेणाऱ्या अट्टल चाेरट्यास कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५,३०० ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : घरफाेडी करून साहित्य चाेरून नेणाऱ्या अट्टल चाेरट्यास कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५,३०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार विजय मालचे यांनी व्यक्त केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी करण्यात आली.
किसन दशरथ ताराम (२३, रा. अब्दुल्ला बाबा दर्गा परिसर झोपडपट्टी, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. नगरसेवक रमेश दुबे यांच्या कामठी शहरातील शुक्रवारी बाजार येथील दुकानात गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री चाेरी झाली. त्यात चाेरट्याने दुकानातील ११ हजार रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच रमेश दुबे यांनी शुक्रवारी सकाळी पाेलिसात तक्रार दाखल केली.
ही चाेरी किसनने केल्याची तसेच ताे चाॅकलेट विकत असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्याचे चाेरी केल्याचे कबूल केल्याने त्याला अटक करण्यात आली. शिवाय, त्याच्याकडून ५,३०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. किसन सराईत चाेर असून, त्याच्याकडून अन्य चाेरीच्या घटनांची माहिती मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस. पाटील, राजेश पाली, संजय गीते, प्रशांत सलाम, पवन गजभिये, अंकुश गजभिये, स्वाती चेटोले यांच्या पथकाने केली.