नागपुरात डॉक्टरला मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:19 AM2020-08-26T00:19:43+5:302020-08-26T00:20:55+5:30

आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल विजय रुडे असे या प्रकरणातील पीडित डॉक्टरचे नाव आहे.

Attempt to extort ransom by beating doctor in Nagpur | नागपुरात डॉक्टरला मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

नागपुरात डॉक्टरला मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देतीन आरोपी : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल विजय रुडे असे या प्रकरणातील पीडित डॉक्टरचे नाव आहे. ते व्यंकटेशनगर, केडीके कॉलेजजवळ राहतात. आरोपी अहमद नामक व्यक्तीचा भाऊ किडनीचा उपचार दीड वर्षांपासून अमोल रुडे यांच्या माध्यमातून घेत होता. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि रुडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर २४ आॅगस्टला सकाळी आरोपी अब्दुल मोहसीन खान (हसनबाग) हा त्यांच्या घरी आला. अहमद यांची प्रकृती खराब असून उपचारासाठी घरी चलण्याची विनंती केली. त्यानुसार रुडे आरोपींकडे गेले. तपासणी करून त्यांनी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. तेथील खर्च विचारल्यानंतर आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. त्यांना दोन लाख रुपयांची खंडणीही मागितली. तसेच त्यांची अ‍ॅक्टिव्हा हिसकावून घेतली. रुडे यांनी या घटनेची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी अब्दुल मोहसीन खान, फैजान अली गफ्फार अली आणि अहमद या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Attempt to extort ransom by beating doctor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.