प्रियकरासोबत जात असलेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Published: June 15, 2017 02:08 AM2017-06-15T02:08:10+5:302017-06-15T02:08:10+5:30

कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध प्रियकरासोबत जात असलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या अपहरण

The attempt of kidnapping of a girl going to a lover | प्रियकरासोबत जात असलेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

प्रियकरासोबत जात असलेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

Next

काँग्रेसनगरात दिवसाढवळ्या घडली घटना : धंतोलीत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध प्रियकरासोबत जात असलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता काँग्रेसनगर येथे घडली.
१९ वर्षीय मुलगी कायद्याची विद्यार्थिनी आहे. ती एका तरुणासोबत प्रेम करते. त्याच्याशी लग्न करायची तिची इच्छा आहे. परंतु तिचा घरच्यांना याला विरोध आहे. दस्तावेज नसल्याने ती घरच्यांना सोडून प्रियकरासोबत राहू लागली. विद्यार्थिनीने आपल्या प्रियकरासोबत ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घतली. त्यांना घटनेची माहिती दिली. विद्यार्थिनीने प्रियकराच्या अजनी येतील मामाच्या घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामीण पोलिसांनी तिला अजनी पोलिसांना सूचना करण्याचा सल्ला दिला. यानंतर मंगळवारी सकाळी ती प्रियकरासोबत अजनी ठाण्यात आली. तिने अजनी पोलिसांनाही लग्न करण्याबाबत सांगितले. पोलिसांनी तिला ती १८ वर्षे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागितले. तिला शपथपत्र बनवून आणण्याचा सल्ला दिला. अजनी पोलिसांनी सांगितल्यानुसार विद्यार्थिनी शपथपत्र बनविण्यासाठी गेली. यादरम्यान तिच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती दिली. शपथपत्र बनविल्यानंतर ती टॅक्सीने रामेश्वरीकडे जात होती. दरम्यान न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर येथे तीन लोकांनी तिची टॅक्सी थांबविली. दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यातील एका व्यक्तीने मी तुझ्या भावासारखा आहे, तुझी आई मरण पावली, असे सांगत तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. यावरून तिचे भांडण झाले.
काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनी, तिचा प्रियकर व त्याच्या बहिणीने टॅक्सीचालकाला लगेच धंतोली पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले. यादरम्यान विद्यार्थिनीचे कुटुंबीयसुद्धा ठाण्यात पोहोचले. दोन्ही बाजूचे लोक ठाण्यात आल्याने वाद वाढला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: The attempt of kidnapping of a girl going to a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.