मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:25 AM2018-02-12T02:25:58+5:302018-02-12T02:26:19+5:30

मंत्रालयात दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या पाच कर्मचाºयांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

 The attempt of self-sacrifice outside Chief Minister's residence | मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

Next

नागपूर : मंत्रालयात दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या पाच कर्मचाºयांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने या कर्मचाºयांच्या घराजवळ, धरमपेठ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात तसेच रामगिरी परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास कारामधून आलेल्या या आंदोलकांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, बडतर्फ कर्मचाºयांना आत्मदहन करू नका, असे समजावण्यासाठी रामगिरी परिसरात आलेले भाजपा ओबीसी मोर्चाचे विदर्भ अध्यक्ष सुभाष घाटे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शीच्या मते घाटे यांच्या वाहनातूनच आत्मदहन करणारे कर्मचारी आले होते.
या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली़ वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला़

Web Title:  The attempt of self-sacrifice outside Chief Minister's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.