उधारी वसुलीसाठी जीव घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:47+5:302021-07-20T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी एका आरोपीने चिकन विक्रेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. सक्करदरा ...

Attempt to take life for debt recovery | उधारी वसुलीसाठी जीव घेण्याचा प्रयत्न

उधारी वसुलीसाठी जीव घेण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी एका आरोपीने चिकन विक्रेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

शेख अरबाज शेख शरीफ कुरेशी (वय २३) असे जखमीचे नाव आहे. तो मोठा ताजबाग परिसरात राहतो. त्याचे बेसा पॉवर हाऊसजवळ मच्छी आणि चिकनचे दुकान आहे. आरोपी युगल नारखेडे (वय २४, रा. अजनी) याने अरबाजला काही दिवसांपूर्वी दोन ते तीन हजार रुपये उसने दिले होते. अरबाज ते परत देत नसल्याने त्यांच्यात वादही झाला होता. त्यावेळी कसेबसे निपटले. रविवारी मध्यरात्री आरोपी नारखेडेने अरबाजला फोन करून दी विदर्भ अमृत महोत्सव अपार्टमेंट, आशीर्वादनगर येथे बोलावले. तेथे आरोपीने धारदार शस्त्राने अरबाजवर हल्ला चढविला. मानेवर आणि पाठीवर वार बसल्याने अरबाज जबर जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे धावले. त्यामुळे आरोपी पळाला. अरबाजला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी नारखेडेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Attempt to take life for debt recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.