‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 09:49 PM2021-08-28T21:49:25+5:302021-08-28T21:50:40+5:30

Nagpur News इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅब चालकाची नोकरी देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र संबंधित युवकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला.

Attempted fraud in the name of getting a job in Indigo | ‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न

‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसतर्कता आली कामीजॉयनिंग लेटरही पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅब चालकाची नोकरी देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र संबंधित युवकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. (Attempted fraud in the name of getting a job in Indigo)

उमेश नानोटकर असे या युवकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हॉट्सॲपवर इंडिगो एअरलाईन्समध्ये कॅब चालकाची नोकरी उपलब्ध असल्याची माहिती सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून कळली होती. त्यांनी ऑनलाईन जाऊन अप्लाय केला असता व्हेरिफिकेशनसाठी ५५० रुपये भरावे लागले. त्यानंतर संबंधितांकडून ऑफर पत्र पाठवून नोकरीची आणि अनेक प्रकारच्या सवलतीची हमी देण्यात आली होती. प्रमोद शिव आणि अमित नामक व्यक्तींचे त्यांना कॉलही आले.

शनिवार पुन्हा त्यांना व्हाॅट्सॲपवर एक पत्र पाठवून ड्रेस आणि सिक्युरिटी डिपॉझिटसाठी ४,५०० रुपये जमा करण्यास सुचविले. त्यामुळे त्यांना संशय आला. जवळच्या एका व्यक्तीकडून त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती मिळविली असता, इंडिगोकडून अशी कसलीही जाहिरात निघाली नसल्याचे कळले. एवढेच नाही तर अनेकांकडून यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचेही कळले. यावरून अनेकजण ठगविले गेले असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्याची तयारी नानोटकर यांनी दर्शविली आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्स आणि एअरपोर्टमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार आता नेहमीचेच झाले आहेत. इंडिगो एअरलाइन्सची कार्यालयीन वेबसाईट गोइंडिगो डॉट इन आहे.

जॉयनिंगचीही दिली होती तारीख

जॉब ऑफर लेटरमध्ये २५,५०० रुपये दरमहा वेतन आणि अनेक सवलती देण्याचा उल्लेख होता. इंडिगो एचआर मॅनेजर या पदनामासह सुरेंद्र कुमार यांच्या सहीने हे पत्र पाठविल्याचे दिसत होते. २ सप्टेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात जॉयनिंग सांगितले होते. रक्कम जमा करण्यासाठी सुरेंद्र कुमार नावाने एका खासगी बँकेचा अकाउंट नंबर (०१४५८६४४३७) देण्यात आला होता. फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचे क्रमांकही संबंधित व्यक्तीला व्हाॅट्सॲपवर पाठविण्यात आले होते.

...

Web Title: Attempted fraud in the name of getting a job in Indigo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.