प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:00 PM2019-02-25T21:00:12+5:302019-02-25T21:03:05+5:30

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी राहुल केशवराव सेवतकर नामक आरोपीला अटक केली.

Attempted to murder of two person on suspicion to tease beloved | प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देनागपुरातील टिळकनगर टी पॉईंटवर थरार : अंबाझरीत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी राहुल केशवराव सेवतकर नामक आरोपीला अटक केली.
राहुलचा मोठा भाऊ एका फायनान्स कंपनीत डेली कलेक्शनचे काम करतो. तो सध्या बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे त्याने त्याचा भाऊ राहुलवर टिळकनगरातील हातठेलेवाल्याकडून रक्कम जमा करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार, रविवारी रात्री ८.३० वाजता आरोपी राहुल त्याच्या प्रेयसीला घेऊन टिळकनगरातील गर्ल्स हॉस्टेलजवळच्या रविलाल परिहारच्या चायनिज ठेल्यावर आला. यावेळी परिहारच्या ठेल्यावर अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे सूप पीत होते. ते आपसात गंमतजंमत करीत होते. राहुलच्या प्रेयसीकडे नजर गेल्याने ते दोघे तिच्याकडे पाहून हसले. त्यामुळे राहुलची प्रेयसी त्या दोघांजवळ आली आणि तिने त्यांना ‘तुम को मा-बहेन नही क्या’ म्हणत झापले. लांडगे आणि साखरेने तिला तिच्या भाषेत उत्तर दिल्यामुळे संतप्त राहुल या दोघांवर चालून आला. त्याने खिशातील चाकू काढून लांडगेवर धाव घेताच बचावासाठी लांडगे आणि साखरेने त्याचा चाकू पकडला. राहुलची प्रेयसीदेखील मधात पडली. राहुलच्या हातातील चाकू तिला लागल्याने तिच्या हातातून रक्ताची धार लागली. ते पाहून राहुल हिंसक बनला. त्याने आडवे तिडवे चाकूचे वार करून दोघांनाही जबर जखमी केले. आरडाओरड आणि शिवीगाळ ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी प्रेयसीसह पळून गेला. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरीचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. तत्पूर्वीच जखमी अक्षय आणि अंशूलला बाजुच्यांनी रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात पोहचविले होते. अक्षयच्या मानेवर डोक्यावर, पोटावर, तोंडावर गंभीर जखमा असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. ते बेशुद्धावस्थेत होते. डॉ. दंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने हे अक्षय तसेच अंशूल शुद्धीवर आले.
दरम्यान अक्षयच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Attempted to murder of two person on suspicion to tease beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.