दुकानाचा अनधिकृत कब्जा घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:43+5:302021-06-02T04:07:43+5:30

दुकान मालक आणि भाडेकरूत वाद : बजाजनगरात तनाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुकान खाली करून घेण्यासाठी भाडेकरूचे सामान ...

Attempted unauthorized occupation of the shop | दुकानाचा अनधिकृत कब्जा घेण्याचा प्रयत्न

दुकानाचा अनधिकृत कब्जा घेण्याचा प्रयत्न

Next

दुकान मालक आणि भाडेकरूत वाद : बजाजनगरात तनाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दुकान खाली करून घेण्यासाठी भाडेकरूचे सामान रस्त्यावर ठेवून मालकाने दुकानाला लोखंडी ग्रील आणि पत्रे ठोकले. तीन दिवसापासून सुरू असलेल्या या प्रकरणात आज वाद चिघळला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याप्रकरणी भाडेकरूची तक्रार नोंदवून घेत बजाजनगर पोलिसांनी विठ्ठल संतोष भोंगाडे (वय ५५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भोंगाडे यांनी काही वर्षांपूर्वी मनीष राजू गोल्हर यांना त्यांचे बजाज नगर चौकातील दुकान भाड्याने दिले होते. येथे गोल्हर यांनी अजय गारमेंट नावाने कपड्याचे दुकान सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून दुकान खाली करण्यावरून दुकान मालक भोंगाडे तसेच भाडेकरू गोल्हर यांच्यात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, २८ मेच्या सकाळी ८.३० वाजता भोंगाडे यांनी गोल्हर यांच्या दुकानाचे कुलूप तोडले आणि आतील कपड्याचे गठ्ठे बांधून फुटपाथवर ठेवले. त्याचप्रमाणे कपडे शिवण्याची मशीन आणि टेबलही बाहेर काढला. त्यानंतर दुकानाला लोखंडी ग्रिल लावून त्यावर पत्रे ठोकले. भोंगाडे यांनी अशाप्रकारे दुकानाचा कब्जा घेतल्यामुळे गोल्हर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गेल्या तीन दिवसांपासून या प्रकरणात धुसफूस सुरू असतानाच मंगळवारी दुपारी दोन्ही गट समोरासमोर आले. त्यामुळे वाद वाढला. दुकानासमोर तणाव निर्माण झाल्याची माहिती कळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाणेदार महेश चव्हाण यांनी दोन्ही गटातील मंडळींना समज देऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर गोल्हर यांच्या तक्रारीवरून भोंगाडेंविरुद्ध जबरदस्तीने दुकानाचा कब्जा घेण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Attempted unauthorized occupation of the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.