जीम ट्रेनरचा जीव घेणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न

By Admin | Published: April 27, 2017 10:22 PM2017-04-27T22:22:34+5:302017-04-27T22:22:34+5:30

बदनामी आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवतानाच अनेकांसमोर बेदम मारहाण करून जीम ट्रेनरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त

Attempts to save the life of Jim Trainer | जीम ट्रेनरचा जीव घेणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न

जीम ट्रेनरचा जीव घेणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - बदनामी आणि पोलीस कारवाईचा धाक दाखवतानाच अनेकांसमोर बेदम मारहाण करून जीम ट्रेनरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलिसाला वाचविण्याचे प्रयत्न जरीपटका पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या नातेवाईकांसह मार्टिननगरातील नातेवाईकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
जेम्स ऊर्फ पॅट्रिक जोसेफ ऊर्फ प्रकाश राधेशाम जखार, (वय ३१) हा तरुण बैरामजी टाऊनमधील तळवलकर जीममध्ये ट्रेनर होता. बाजूलाच राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. नंतर त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्यानंतर या घटनेतील आरोपी बिजिट ऊर्फ सुजी ललित जेम्स (वय २६) पोलीस कर्मचारी आहे, ती आणि तिच्या अन्य एका पोलीस कर्मचारी असलेल्या साथीदाराने संगनमत करून जेम्सला २४ एप्रिलच्या रात्री तसेच २५ एप्रिलच्या सकाळी जीममध्ये जाऊन अनेकांसमोर मारहाण केली. त्याला बदनाम करून पोलीस ठाण्यात डांबण्याची आणि जीवे मारण्याचीही धमकी दिली. जीममधील अनेकांदेखत अपमान झाल्याने जेम्सच्या मनावर विपरीत परिणाम झाला. २५ एप्रिलला तो जीममधून घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर एलीझाबेझ राधेश्याम जखार (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बिजिट ऊर्फ सुजी, ज्योती ललित जेम्स आणि मारहाण करणाऱ्या ह्यत्याह्ण पोलिसाविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा घडून तीन दिवस झाले मात्र पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. विशेष म्हणजे, आरोपी पोलिसाचे नाव माहीत असूनही पोलिसांनी त्याचे नाव माहिती कक्षाला अद्याप कळविले नाही.
 
आयुक्तांकडे होणार तक्रार
जेम्सने आत्महत्या केल्याचे कळताच आरोपी सुजी आणि ज्योतीने त्याच्या घरातून त्याचा मोबाईल चोरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चोरी आणि पुरावा नष्ट करण्याचे कलमदेखील लावले नाही. आरोपी पोलीस कर्मचारी मोकाट फिरत आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, याची वाट बघत असल्याचा पोलिसांवर संशय घेण्यात येत आहे. पोलिसांच्या एकूणच भूमिकेवरून या भागातील सामाजिक कार्यकर्ते संतप्तत झाले आहेत. सुस्वभावी जेम्स त्याच्या वृद्ध आईच्या जगण्याचा आधार होता. तो हिरावून घेणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी तसेच आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या जरीपटका पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे नागरिक करणार आहेत.

Web Title: Attempts to save the life of Jim Trainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.