पहिल्याच दिवशी १६,१९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:32+5:302020-12-15T04:25:32+5:30
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६४८ शाळा सोमवारी सुरू झाल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना ...
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६४८ शाळा सोमवारी सुरू झाल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या उपाययोजना शाळा व जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. शाळांमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग ठेवून विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. वर्गातही झिकझॅक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क लावलेले होते. शाळेत हॅण्ड सॅनिटायझर मशीन, बेसिनवर हात धुण्यासाठी साबण ठेवण्यात आली होती. चार तास शाळा घेण्यात आली. सुरक्षेच्या उपाययोजनांची पायमल्ली होऊ नये म्हणून वर्ग २ च्या अधिकाऱ्यांकडून शाळांची पाहणी करण्यात आली. बऱ्याच महिन्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.
- शाळा भेटीचा अहवाल
उपस्थित विद्यार्थी १६,१९८
उपस्थित शिक्षक ४,७७२
उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी - २,५०६
बसमधून आलेले विद्यार्थी - ४,०२२
इतर वाहनाने आलेले विद्यार्थी - ९,२१३
पॉझिटिव्ह आलेले शिक्षक - ५३
पालकांनी आतापर्यंत दिलेले संमतीपत्र - २९,४००