तीन हजार रुग्णांमागे एक अटेंडंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:21 AM2017-08-26T01:21:28+5:302017-08-26T01:21:45+5:30

रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ एवढीच अटेंडंटची भूमिका महत्त्वाची असते. विशेषत: रुग्णाला तातडीने वॉर्डात, अतिदक्षता विभागात किंवा शस्त्रक्रिया गृहात पोहचविण्यासाठी अटेंडंटची कामगिरी मोलाची ठरते.

An attendant behind three thousand patients | तीन हजार रुग्णांमागे एक अटेंडंट

तीन हजार रुग्णांमागे एक अटेंडंट

googlenewsNext
ठळक मुद्देबाह्यरुग्ण विभागाची स्थिती : आप्तांच्या उपचारासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ एवढीच अटेंडंटची भूमिका महत्त्वाची असते. विशेषत: रुग्णाला तातडीने वॉर्डात, अतिदक्षता विभागात किंवा शस्त्रक्रिया गृहात पोहचविण्यासाठी अटेंडंटची कामगिरी मोलाची ठरते. मात्र, मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) अडीच ते तीन हजाराच्या घरात रुग्ण येत असतानाही त्यांच्या मदतीसाठी एक अटेंडंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिणामी, गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर किंवा ट्रायसिकल शोधण्यापासून त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची जबाबदारी सांभाळावी लागते.
विशेष म्हणजे, गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गर्भवती वेदनेने विव्हळत होती. तिला संबंधित कक्षात जाणेही अवघड झाले होते. गर्भवतीला जमिनीवरच बसवून तिचे नातेवाईक स्ट्रेचरसाठी धावाधाव करीत होते. अखेर एका इसमाने दुसरीकडून स्ट्रेचर जमवून दिल्याने त्या गर्भवतीला वेळेत डॉक्टरापर्यंत पोहचणे शक्य झाले.
मेडिकल रुग्णालात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, मनुष्यबळ नसल्यामुळे अटेंडंटचे काम नातेवाईकांनाच करावे लागत असल्याचे चित्र आहे. एकापेक्षा एक यंत्र उपलब्ध करण्यात येत आहे. परंतु, त्यांना आॅपरेट करणाºया तंत्रज्ञांची कमतरता आहे. ओपीडीत सकाळी रुग्णांची प्रचंड गर्दी असते. यात अनेक रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्यांना स्ट्रेचर किंवा ट्रायसिकलची गरज असते. मेडिकल प्रशासनाने ओपीडीसाठी एकच अटेंडंट दिला आहे. परंतु तो जागेवरच राहत नाही. यामुळे नातेवाईकांना स्ट्रेचर शोधण्यापासून ते त्यांना डॉक्टरांपर्यंत घेऊन जावे लागत असल्याने बºयाचदा उपचारात उशीर होतो. अनेकवेळा नातेवाईकांना रुग्णाला उचलूनही घेऊन जावे लागते. प्रशासन मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही. मेडिकलमध्ये ४५ वॉर्ड आहेत. क्षमतेनुसार जवळपास ५०० वर अटेंडंटची गरज आहे. मात्र त्या तुलनेत केवळ १०० अटेंडंट सेवेत आहेत.

Web Title: An attendant behind three thousand patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.