नागपूर विधीमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे दुर्र्मिळ अंक वेधून घेताहेत सर्वांचे लक्ष; १९६४ पासूनचे विशेषांक उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:21 PM2017-12-11T20:21:04+5:302017-12-11T20:21:30+5:30

राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिमंडळ परिसरात भरवण्यात आले आहे. लोकराज्यचे विविध दुर्मीळ अंक यावेळीही लक्ष्य वेधून घेत आहेत.

The attention of all the people in the Nagpur Vidyamandal area is catching the scales of 'Lokrajya'; Specialties available from 1964 | नागपूर विधीमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे दुर्र्मिळ अंक वेधून घेताहेत सर्वांचे लक्ष; १९६४ पासूनचे विशेषांक उपलब्ध

नागपूर विधीमंडळ परिसरात ‘लोकराज्य’चे दुर्र्मिळ अंक वेधून घेताहेत सर्वांचे लक्ष; १९६४ पासूनचे विशेषांक उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर व अमरावती विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

आॅनलाईन लोकमत
नागपूर :
हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात १९६४ पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर १९९०), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (२०११ व २०१७) अखिल भारतीय साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र वार्षिकी’ व ‘महामानव’ ही पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत.
सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट) मुद्रित केलेले असायचे. २००६ पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रित करून वाचकांच्या हातात पडू लागले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक(पुणे) मोहन राठोड, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. गवई यांच्या जीवनकार्यावरील ‘अजातशत्रू’ स्मृतिग्रंथ
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी ‘अजातशत्रू’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मुंबईत २५ जुलै रोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले. हा ग्रंथही येथे प्रदर्शनास व विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: The attention of all the people in the Nagpur Vidyamandal area is catching the scales of 'Lokrajya'; Specialties available from 1964

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार