पोळ्याच्या पार्श्वभूमीवर अवैध शिकारीवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:21+5:302021-09-06T04:12:21+5:30
नागपूर : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रालगत होणाऱ्या शिकारीच्या घटना लक्षात घेता वन कर्मचाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. वनविभागाचे ...
नागपूर : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रालगत होणाऱ्या शिकारीच्या घटना लक्षात घेता वन कर्मचाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. वनविभागाचे मोबाईल स्क्वॉड अधिक सक्रिय झाले असून गस्त वाढली आहे.
नागपूरलगतच्या जंगलात वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे जंगलालगतचे शिकारी अधिक सक्रिय असतात. हे लक्षात घेता शुक्रवारी नागपूर प्रादेशिक विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांनी यंत्रणेला गस्त वाढविण्याचे आणि आपआपल्या स्तरावर तीन पथके तयार करून अहवाल कळविण्यास सांगण्यात आले आहे.
मांस विक्रीची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. वन्यजीवांची मांस विक्री करणारे आणि ते खरेदी करणारे अशा दोघांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना आहेत.