महिलांसाठी आकर्षक हेअर पिन्स येणार आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:30 PM2018-01-05T21:30:45+5:302018-01-05T21:34:13+5:30

महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, खुर्ची ,टेबल आदी विविध वस्तू नागपूरच्या बाजारात लवकरच दाखल होणार आहेत.

Attractive hairpins will be available for women directly from the Pench Tiger Reserve project | महिलांसाठी आकर्षक हेअर पिन्स येणार आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून

महिलांसाठी आकर्षक हेअर पिन्स येणार आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून

Next
ठळक मुद्देघाणेरी वनस्पतीपासून निर्मिती : आदिवासींना रोजगाराची संधी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, खुर्ची ,टेबल आदी विविध वस्तू नागपूरच्या बाजारात लवकरच दाखल होणार आहेत.
सातपुडा फाऊंडेशनच्यावतीने यासंबंधीचे एक प्रशिक्षण नुकतेच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात राहणाऱ्या युवक युवतींना देण्यात आले. घाणेरी (लँटेना) या वनस्पतीपासून या आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सुवरधरा, चारगाव व शीलादेवी या गावांमधील एकूण अकरा युवक युवतींना देण्यात आले. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींनी घाणेरीपासून तयार केलेल्या हेअर पिन, की चेन, कपडे लटकविन्याचे हँगर, ट्रे, फ्रूट बास्केट, फुलदाणी, खुर्ची, टेबल या वस्तू तयार केल्यात.
घाणेरीचा फर्निचर व वस्तू बनविण्यासाठी वापर करण्याच्या संकल्पनेचे शिल्पकार व सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी युवकांना हा रोजगार उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याची घोषणा केली. सातपुडा फाऊंडेशनतर्फे सुरुवातीला या वस्तू पेंच येथील कोलितमारा व सिल्लारी पर्यटन संकुल तसेच जन-वन स्टोल्स वर उपलब्ध करून देण्यात येतील व दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील निवडक दुकानांमध्ये या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला सुवरधरा समितीचे अध्यक्ष ईश्वर सहारे, सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता, संवर्धन अधिकारी बंडू उईके, दिलीप लांजेवार, वनपाल एस. बी. राउत व गावकरी उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी नीलेश गावंडे यांनी प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक ऋषिकेश रंजन यांनी या प्रशिक्षणासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमधून आर्थिक साहाय्य मिळवून दिले. सातपुडा फाऊंडेशनचे बंडू उईके व दिलीप लांजेवार यांनी 'लँटेना क्राफ्ट' विक्रीकरिता बाजारपेठ मिळविण्यासाठी आपण मदत करू असे सांगितले. सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता व क्षेत्र सहायक बाळकृष्ण बगमारे यांनी चित्रफित दाखविली. यावेळी प्रशिक्षक शत्रूघ्न वरठी यांनी प्रशिक्षनार्थींनी दाखविलेल्या कौशल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिलादेवी येथील प्रशिक्षणार्थी अरुण नेईकाम, महिला सदस्य दीपाली व सुरेखा यांनी आपल्याला आता रोजगाराची खात्री झाल्याचे सांगितले.

Web Title: Attractive hairpins will be available for women directly from the Pench Tiger Reserve project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.