वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:59 PM2020-07-14T22:59:50+5:302020-07-14T23:00:43+5:30

तीन मालमत्ता बळकावल्याचा खुलासा : पोलिसांनी घेतली गंभीर दखल, जागोजागी छापेमारी 

Audio clip of controversial Sahil goes viral in nagpur | वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

Next

नरेश डोंगरे

नागपूर : महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रवीण गंटावार यांच्यावर एसीबीने केलेल्या कारवाईनंतर अचानक चर्चेत आलेला साहिल सय्यद नामक गुन्हेगाराची पुन्हा एक ऑडिओ क्लिप पोलिसांकडे पोहोचली आहे. निराधार आणि असहाय व्यक्तींच्या लाखोंच्या मालमत्ता साथीदाराच्या मदतीने बळकावल्याचा खुलासा या क्लिपमधून झाला आहे. विविध ठिकाणच्या मालमत्ता बळकावल्यानंतर साथीदाराला कबूल केलेले तीन लाख रुपये साहिलने दिले नसल्यामुळे साहिलच्या साथीदारांनी ही क्लिप व्हायरल केली. ती पोलिसांकडे पोहोचली आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपूर शहरात जमिनीला सोन्यापेक्षा जास्त भाव आले आहे. छोट्याशा भूखंडाची किंमत लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे येथे भूमाफियांची बजबज झाली आहे. ज्या ठिकाणी असहाय वृद्ध ल, एकाकी व्यक्ती राहतात किंवा ज्या मालमत्तेचे वारसदार बाहेरगावी राहतात, अशा मालमत्ता हेरून शहरातील भूमाफिया आणि गुंड त्या मालमत्तेवर कब्जा करतात. त्याची बनावट कागदपत्रे तयार करून नंतर लाखो-करोडोत ही मालमत्ता विकली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शहरात हा गोरखधंदा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी ग्वालबनशी नामक भूमाफियाचे साम्राज्य पोलिसांनी उलथवून लावले. त्यामुळे काही दिवस भूमाफियांनी गप्प बसणे पसंत केले होते. मात्र आता ही पिलावळ पुन्हा वळवळू लागली आहे. लोकमत'च्या हाती लागलेल्या क्लिप मधून साहिल सय्यद नामक गुन्हेगाराने त्याच्या साथीदाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने ३ मोक्याच्या मालमत्ता बळकावल्या त्याचा खुलासा झाला आहे. 

दरम्यान, ज्याच्या मदतीने त्याने या मालमत्ता बळकावल्या त्याला ठरल्याप्रमाणे रक्कम न दिल्यामुळे या गोरखधंद्याचे बिंग फुटले आहे. ही वादग्रस्त ऑडिओ क्लिप पोलिसांकडे पोहोचली असून पोलिसांनी क्लिपची गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वीही साहिलची एक ऑडिओ क्लिप  व्हायरल झाली होती. त्यात त्याने अत्यंत आक्षेपार्ह संभाषण करून अनेक अधिकारी, नेते आणि पदाधिकाऱ्यांचे नाव घेऊन  स्टिंग ऑपरेशनचाही  उल्लेख केला आहे.  या क्लीपची गुन्हे शाखा पोलीस  आणि  एसीबीचे अधिकारी चौकशी करीत आहेत. या नव्या  क्लिपमुळे त्याच्या अडचणी वाढण्याचे संकेत आहेत.  पोलीस रात्रीपासून साहिल आणि त्याच्या साथीदारांचा जागोजागी शोध घेत आहेत. 

संबंधित ऑडिओ क्लिप मधील काही संभाषण पुढील प्रमाणे आहे.

साहिल : वो प्रॉपर्टी अभी बिकी नही. मेरे उसमे २५ लाख फसे है. 

साथीदार : प्रॉपर्टी आपकी है... मेरा उसमे कोई शेअर नही... वो  आपका लूक आऊट है... 

साहिल : वो प्रॉपर्टी खाली कराया था उसके तीन लाख रुपये देणे का ठहेरा था.
सबके सामने ये बात हो गई थी.
जब प्रॉपर्टी बिकेनगी, तब तुमको तुम्हारे पैसे देने की. मेरे खुदके उसमे पच्चीस २५- ३० लाख रुपये फसे है.

साथीदार : हा... तो

 साहिल : उस्मेसे तुमको एक लाख, ३० हजार दिये. मेरे पास रेकॉर्ड है. मेरे पास मे सब रेकॉर्ड रहता है.

साथीदार : अच्छी बात है, तुम रेकॉर्ड रखो. बाकी पैसे नही मिले.

साहिल : तुमको इसके पहिले कई बार पैसे दिये है...
साथीदार : हूं...

 साहिल : जीस दिन प्रॉपर्टी बिकेनगी,  गिरीश तुम्हारे घर आ कर पैसे ला कर देगा. प्रॉपर्टी पर अभी स्टे है..

साथीदार : पंचशील वाली प्रॉपर्टी खाली कराया था...
साहिल : कौनसी ?

साथीदार : कमाल चौक वाली...
साहिल : अच्छा... वो तो एक रात का काम था. उसके कितने पैसे होना... बता दो.

साथीदार : क्या बात करते हो भाई... वो क्या एक रात का काम था?

साहिल : हा...
 मै तुम्हारे कई बार काम आया, उसका क्या?
 मैने कोई हिसाब नही रखा. नही तो चार-पाच लाख हो जाते.

साथीदार : ये गलत है... तुम चार-पाच लाख दे नही सकते.

साहिल : कितनी बार ले गये तुम पैसे. २५ हजार, १० हजार, १५ हजार...

साथीदार : कब दिये २५ हजार...?

साहिल : और मै तुम्हारे कितनी बार काम आया. उसका क्या... उसका हिसाब मैने नही रखा.

साथीदार : और वो दुसरी प्रॉपर्टी 

साहिल : कोनसी... जोशी वाली.
...
साथीदार : वो तो तुम्हारे पास है...

साहिल : अभी लॉक डाऊन के कारण मेरे खुदके पैसे फसे है. जब प्रॉपर्टी बिकिंगी तब तुम्हारे १ लाख, ७० हजार रुपये तुम्हे घर पर मिल जायेंगे... इतनी बात करने की जरूरत नही पडेगी... मै तुमको चेक पेमेंट करुंगा...तुम लिखकर देना अपना एग्रीमेंट खतम
 

Web Title: Audio clip of controversial Sahil goes viral in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.