बुकी अजय राऊतच्या अड्ड्यावर धाड

By admin | Published: February 21, 2016 02:38 AM2016-02-21T02:38:05+5:302016-02-21T02:38:05+5:30

अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर ...

Aunt in the bookie Ajay Raut | बुकी अजय राऊतच्या अड्ड्यावर धाड

बुकी अजय राऊतच्या अड्ड्यावर धाड

Next

तीन बुकी गजाआड : राऊतसह दोघे फरार
नागपूर : अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाड घालून रोख आणि मोबाईलसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राऊतचा एक भागीदार तसेच दोन पंटर अशा तिघांना अटक करण्यात आली. तर, स्वत: राऊत आणि त्याचा भागीदार फरार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
नरेंद्रनगरात साईकृपा सोसायटी असून, तेथे सुमती अपार्टमेंटमधील ४०१ क्रमांकाची सदनिका अजय राऊतच्या मालकीची आहे. ती त्याने आनंद तुकाराम बोंदरे याला हायटेक क्रिकेट सटट्याचा अड्डा चालविण्यासाठी दिली होती. तेथे क्रिकेट सामन्यावर रोज लाखोंची खयवाडी-लगवाडी होत असल्याची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सुधीर बघेल, हवलदार मंगेश करडे, प्रकाश सिडाम, राजू धोपटे, सुरेश हिंगणेकर, नायक विजय दासरवार, सतीश राऊत, सुजीत देव्हारे, अमोल पडघान यांनी शुक्रवारी मध्यरात्री अड्ड्यावर धाड घातली. यावेळी तेथे आनंद बोंदरे, प्रमोद मनोहर भोजापुरे (रा. नंदनवन) आणि सुरेश नत्थूजी तुमडाम (रा. पिपळा, हुडकेश्वर) दक्षीण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एलसीडी, ३ रेकॉर्डर बॉक्स, ३८ मोबाईल, २ लॅपटॉप, प्रिंटर, खयवाडीचा पाना आणि रोख ५४ हजार, ६०० रुपये असा एकूण २ लाख, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करून या तिघांना अटक करण्यात आली. अजय राऊत आणि जितू कमनानी फरार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

नगपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेले पावणेदोन कोटी रुपये भद्रे गँगला दिल्यामुळे कुख्यात अजय राऊत प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Web Title: Aunt in the bookie Ajay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.