वासनकरच्या मालमत्तेचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:19 AM2017-11-15T01:19:18+5:302017-11-15T01:21:05+5:30
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या १९ मालमत्तांचा लिलाव केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या १९ मालमत्तांचा लिलाव केला जात आहे. लिलावाला मंगळवारपासून सक्षम प्राधिकाºयाच्या कार्यालयात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३.०९ कोटी रुपयांच्या ८ मालमत्तांवर ४.४४ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या मालमत्ता पाच जणांनी खरेदी केल्या.
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या गुंतवणूकदारांना मूळ गुंतवणुकीचे ९८ कोटी ७१ लाख ३६ हजार ४०३ रुपये व त्यावरील व्याज पकडून एकूण १८३ कोटी ४८ लाख ५८ हजार ५८५ रुपये परत करायचे आहेत. लिलाव झालेल्या आठ मालमत्तांपैकी एनआयटी सिव्हिल स्टेशन विस्तार योजना, अंबाझरी येथील १ कोटी १४ लाख ५ हजार ४८६ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता नागपूर सॉफ्ट टेक कंपनीने १ कोटी ५९ लाख ५० हजार रुपयांत, एनआयटी सिव्हिल स्टेशन विस्तार योजना, अंबाझरी व मंगरुळ, पिंपळधरा येथील ५४ लाख २५ हजार १७२ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता कैलाश अग्रवाल यांनी ८१ लाख ५० हजार रुपयांत, प्लॉट क्र. ५८, प्रसादनगर ही
अभिजित चौधरीची ६९ लाख ७५ हजार रुपयांची मालमत्ता भंवरलाल कानगो यांनी रोहन पैठनकर यांच्यामार्फत १ कोटी ७ लाख रुपयांत, मंगरुळ, पिंपळधरा येथील १३ लाख ९ हजार ७७० रुपयांची मालमत्ता संजय पुराणिक यांनी १९ लाखांत तर, नागलवाडी, हिंगणा येथील २६ लाख ६० हजार ८४३ रुपये किमतीच्या दोन मालमत्ता विनायक कांबळे यांनी २७ लाख रुपयांत खरेदी केल्या.