नागपुरात आॅटो मीटरची सक्ती : ७५ आॅटोचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:31 PM2018-01-02T23:31:45+5:302018-01-02T23:34:06+5:30

उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे १० हजारांवर आॅटोरिक्षा आहेत. यातील सर्वच आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास कुणीच मीटरने चालायला तयार नाही. याची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसांनी घेऊन संयुक्त विशेष मोहीम हाती घेतली. मंगळवारी ७५ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली.

Auto miter must in Nagpur: Action on 75 Auto riksha drivers | नागपुरात आॅटो मीटरची सक्ती : ७५ आॅटोचालकांवर कारवाई

नागपुरात आॅटो मीटरची सक्ती : ७५ आॅटोचालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देवाहतूक पोलीस व आरटीओची संयुक्त मोहीम

आॅनलाईन लोकमत
नागपूर : उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे १० हजारांवर आॅटोरिक्षा आहेत. यातील सर्वच आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास कुणीच मीटरने चालायला तयार नाही. याची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसांनी घेऊन संयुक्त विशेष मोहीम हाती घेतली. मंगळवारी ७५ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली.
आॅटो मीटरने चालावते यासाठी २०१४ मध्ये हकीम समितीनुसार आॅटोरिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आली. प्रत्येक किलोमीटरकरिता १४ रुपये निश्चित करण्यात आले. परंतु शहरातील आॅटोचालकांनी याला प्रतिसाद दिला नाही. याच दरम्यान आरटीओने आॅटोच्या मीटरची सक्ती करून हजारावर आॅटोचालकांवर कारवाई केली. परंतु नंतर ही कारवाई मंदावली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नुकतेच आॅटोरिक्षा मीटरने चालण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी वाहतूक चेम्बर २ च्या वतीने मध्यवर्ती रेल्वे स्थानक व अजनी रेल्वे स्थानकावर आॅटोरिक्षांची तपासणी करण्यात आली. यावेळी ७५ आॅटोरिक्षा दोषी आढळून आले. त्यांच्यावर चालानची कारवाई करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एम. पांडे, सिद्धीकी, समशाद व परिवहन निरीक्षक ठेंगणे यांनी केली. ‘लोकमत’शी बोलताना भांडारकर यांनी प्रवाशांना आॅटोरिक्षातून प्रवास करताना मीटरनेच चालावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, आॅटोरिक्षातून मीटरनेच चालावे यासाठी प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे.

Web Title: Auto miter must in Nagpur: Action on 75 Auto riksha drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.