ऑटो सिग्नलिंग, थर्डलाईनच्या कामामुळे रेल्वेगाड्या विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:49+5:302021-07-02T04:06:49+5:30

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बोरतलाव स्टेशनला थर्डलाईनशी जोडण्याचे (नॉन इंटरलॉकिंग) काम २ ते ५ जुलैपर्यंत आणि दरेकसा स्टेशनला थर्ड ...

Auto signaling, third line work disrupts trains | ऑटो सिग्नलिंग, थर्डलाईनच्या कामामुळे रेल्वेगाड्या विस्कळीत

ऑटो सिग्नलिंग, थर्डलाईनच्या कामामुळे रेल्वेगाड्या विस्कळीत

Next

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बोरतलाव स्टेशनला थर्डलाईनशी जोडण्याचे (नॉन इंटरलॉकिंग) काम २ ते ५ जुलैपर्यंत आणि दरेकसा स्टेशनला थर्ड लाईनशी जोडण्याचे काम ८ जुलैच्या सकाळी ८ पासून १० जुलैच्या सकाळी ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे ५ आणि ६ जुलैला दुर्ग आणि गोंदिया येथून धावणारी ०८७४१ दुर्ग-गोंदिया मेमू तसेच ०८७४३ गोंदिया-इतवारी मेमू स्पेशल रद्द करण्यात आली आहे. ५ आणि ६ जुलैला गोंदिया आणि दुर्गवरून धावणारी ०८७४४ इतवारी-गोंदिया, ०८७४२ गोंदिया-दुर्ग विशेष रेल्वेगाडी रद्द राहणार आहे. ४ आणि ७ जुलैला गोंदियावरून सुटणारी ०८८६१ गोंदिया-झारसुगडा विशेष गाडी रद्द राहणार आहे. ५ आणि ८ जुलैला झारसुगडा येथून सुटणारी ०८८६२ झारसुगडा-गोंदिया विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच ४ जुलैला निजामुद्दीनवरून सुटणारी ०२८८८ निजामुद्दीन-विशाखापट्टनम समता एक्स्प्रेस आणि ०२४९७ कुर्ला-सांतरागाछी विशेष रेल्वेगाडी नागपूर विभागातील गोंदिया आणि सालेकसा रेल्वेस्थानकावर नियंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय इतवारीवरून सुटणारी ०८२४० इतवारी-बिलासपूर स्पेशल ही गाडी एक तास उशिराने सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

.............

Web Title: Auto signaling, third line work disrupts trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.