रेल्वेस्थानकांवर आता ऑटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीन
By नरेश डोंगरे | Published: May 16, 2024 08:27 PM2024-05-16T20:27:46+5:302024-05-16T20:28:07+5:30
तिकीट काउंटरवर होणारी गर्दी लक्षात घेता, ही व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांवर आता ऑटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीन (एटीव्हीएम)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिकीट काउंटरवर होणारी गर्दी लक्षात घेता, ही व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
विविध रेल्वेस्थानकांच्या तिकीट काउंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तिकीट काढताना त्रास होतो. ते लक्षात घेऊन गर्दीत आणि लांब रांगेत ज्येष्ठ नागरिकांवर ताटकळत उभे राहण्याची वेळ येऊ नये म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील एकूण १९ स्थानकांवर ऑटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील नागपूर विभागातील १५ स्थानकांचा समावेश आहे. ही स्थानके कोणती, ते मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेले नाही.