नागपूर जिल्ह्यात ऑटोरिक्षाला ट्रकची धडक; सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:56 PM2020-03-06T21:56:30+5:302020-03-06T21:56:52+5:30
नागपूर जिल्ह्यात बाजारगावकडून ऐरणगांवकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह सात प्रवासी गंभीर झाले असून यात एका १८ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोंढाळी: बाजारगावकडून ऐरणगांवकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह सात प्रवासी गंभीर झाले असून यात एका १८ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच.४०/पी २११८ मध्ये सात प्रवासी घेऊन ऑटोचालक लक्ष्मण गोमाजी टेकाम (४५) रा.पांजरा पठार हा बाजारगाव येथून ऐरणागांवकडे जात होता. पांजरा घाटात समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक सी.जी.०४/जी. ८८८५ नेऑटोला जबर धडक दिली. या अपघातात ऑटोच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातात मंगीलाल चव्हाण (६५) रा.चिचोली पठार, आशा डोंगरे (४०) रा.चिचोली पठार, जगदीश राठोड (५०) रा.आगरगाव तांडा, अनिल आडे (४०), साधना अनिल आडे (३५), खेमचंद आडे (१८ महिने) रा.वंडली, विठ्ठराव राठोड (५०) रा. आगरगाव हे प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने मिळेल त्या वाहनाने कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ.बिलाल पठाण यांनी प्राथमिक उपचार करुन जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रेफर केले. कोंढाळी पोलिसांनी ट्रक चालक नितीन तुकाराम मनोके (३८)रा.पुसला ता.वरुड, जि.अमरावती याला अटक करून अपघाताचा गुन्हा नोंदविला.