नागपूर विभागात सरासरी २७.८८ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 08:59 PM2019-09-05T20:59:01+5:302019-09-05T20:59:41+5:30

नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २७.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली येथे सर्वाधिक १६३.४० मि.मी., चामोर्शी ६७.८० मि.मी., तर कुरखेडा तालुक्यात ६७.३० मिमी पावसाची नोंद झाली.

Average rainfall in Nagpur region is 27.88 mm | नागपूर विभागात सरासरी २७.८८ मिमी पाऊस

नागपूर विभागात सरासरी २७.८८ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देगडचिरोली येथे सर्वाधिक १६३.४० मिमी अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २७.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली येथे सर्वाधिक १६३.४० मि.मी., चामोर्शी ६७.८० मि.मी., तर कुरखेडा तालुक्यात ६७.३० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात १२१.५०, तर सावली तालुक्यात ८७ मि. मी., वर्धा जिल्ह्यात सेलू ८९, आष्टी ७९.५३ तर आर्वी ६६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे वर्धा ४८.८२ मि.मी., गडचिरोली ३९.४३ मि.मी, चंद्रपूर ३३.३० मि.मी., नागपूर २४.२२ मि.मी., गोंदिया १०.९० मि.मी., तर सर्वात कमी पाऊस भंडारा जिल्ह्यात १०.६३ मि.मी. पडला आहे.
नागपूर विभागात १ जून २०१९ ते ५ सप्टेंबर २०१९ पर्यंत सरासरी ९९७.७० मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Web Title: Average rainfall in Nagpur region is 27.88 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.