अविनाश तितरमारे यांची पुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:06+5:302021-02-05T04:39:06+5:30

मांढळ : स्थानिक श्री लेमदेव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश तितरमारे राज्यस्तरीय प्रशंसा प्रमाणपत्र ...

Avinash Titramare selected for the award | अविनाश तितरमारे यांची पुरस्कारासाठी निवड

अविनाश तितरमारे यांची पुरस्कारासाठी निवड

googlenewsNext

मांढळ : स्थानिक श्री लेमदेव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश तितरमारे राज्यस्तरीय प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारासाठी निवड झाले आहे. त्यामुळे त्यांचा महाविद्यालयात आयाेजित छाेटेखानी कार्यक्रमात गाैरव करण्यात आला.

ते २९ वर्षांपासून या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना आजवर अनेक पुरस्काराने गाैरविण्यात आले आहे. यानिमित्ताने महाविद्यालयात प्राचार्य प्रदीप रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित कार्यक्रमात त्यांचा गाैरव करण्यात आला. याप्रसंगी बाबा तितरमारे, प्रा. प्रकाश कटामुसरे, नरेश जाधव, प्रा. तीर्थराज कापगते, दिलीप गंथले, प्रा. पंकज मेश्राम, दीपक ताईकर, नवनीत लांबा यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक महेश गायधनी यांनी केले. संचालन डॉ. स्मिता खरकाळे यांनी केले. प्रा. शुभांगी जुवार यांनी आभार मानले.

Web Title: Avinash Titramare selected for the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.