पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:03+5:302021-01-15T04:08:03+5:30

पालकमंत्र्यांचे आवाहन : दुचाकी वाहनचालकांनी काळजी घ्यावी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नायलॉन मांजामुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...

Avoid using nylon cats when flying kites | पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर टाळा

पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर टाळा

Next

पालकमंत्र्यांचे आवाहन : दुचाकी वाहनचालकांनी काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नायलॉन मांजामुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढतच आहेत. नायलॉन मांजावर बंदी असतानाही याचा वापर करण्यात येतो. पोलीस प्रशासन याबाबत कायदेशीर कारवाई करीत आहे. पतंग उडवण्याचा आनंद घेताना आपण नायलॉन मांजाचा वापर टाळावा, अशी विनंती करीत नागरिकांनी पुढील किमान सहा दिवस काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

लहान मुलांना बाईकवर पुढे बसवू नका. पतंगाच्या दोराने लहान बाळाच्या मानेला, चेहऱ्याला, डोळ्याला इजा होऊ शकते.

आपले वाहन सावधतेने चालवा जेणेकरून पतंगाच्या दोऱ्यापासून वेळीच बचाव करता येईल.

हेल्मेटचा नियमित वापर करा. वाहन चालवताना गळ्याभोवती मफलर किंवा रुमाल गुंडाळून घ्या, जेणेकरून नायलॉन मांजापासून गळ्याचे रक्षण होईल. वीज वाहून नेणाऱ्या तारांजवळ पतंग उडवणे टाळून मकरसंक्रांत साजरी करा. तिळगुळाचा गोडवा नातीगोती व मैत्रीमध्ये वाढवा, असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.

Web Title: Avoid using nylon cats when flying kites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.