नागपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:19 PM2020-07-08T20:19:04+5:302020-07-08T20:20:31+5:30

ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. कोट्यवधी रुपये खर्चून लक्ष वेधून घेणाऱ्या इमारती २०१७ मध्ये पूर्ण झाल्या. कधी तांत्रिक कारणाने, तर कधी श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी तर आता कोरोनाच्या संक्रमणामुळे आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

Awaiting inauguration of four primary health centers in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. कोट्यवधी रुपये खर्चून लक्ष वेधून घेणाऱ्या इमारती २०१७ मध्ये पूर्ण झाल्या. कधी तांत्रिक कारणाने, तर कधी श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी तर आता कोरोनाच्या संक्रमणामुळे आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या भव्यदिव्य इमारती धूळखात पडल्या आहे. विशेष म्हणजे अजूनही या इमारती बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केल्या नसल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेता, शासनाने ४ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. यातील कामठी तालुक्यात भूगाव, मौदा येथे धानला, नरखेडमध्ये भिष्णूर व नागपूर ग्रामीणमध्ये सालई गोधनी येथे आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु या चार आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून पडल्या असल्याने किमान दीड ते दोन लाख ग्रामस्थांना याचा लाभ होऊ शकला नाही. सध्या या इमारती धूळखात पडल्या आहेत. विशेष म्हणजे, शासनाने या चार ही पीएचसीकरिता ५ नियमित पदेही मंजूर केली आहेत. यामध्ये २ मेडिकल ऑफिसर, आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य सहायक महिला व आरोग्य सेविका यांची प्रत्येकी एक पदे मंजूर आहेत तर उर्वरित कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुरुष, औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक आदी पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचे निर्देश जि.प.च्या आरोग्य विभागाला दिले आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागाने ही कंत्राटी पदे भरण्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली असल्याची माहिती आहे. परंतू कोविड-१९ मुळे ही संपूर्ण प्रक्रिया सध्या थंडबस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अध्यक्षांनी मिळाली नव्हती नेत्यांची वेळ
जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत असताना आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन नेत्यांच्या हस्ते करण्याचा मानस तत्कालीन अध्यक्षांनी बाळगला होता. परंतु त्यांना नेत्यांची वेळच मिळाली नाही तर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर कोरोना पसरल्यामुळे इमारती उद्घाटनाविनाच राहिल्या.

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. फर्निचरच्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला आहे. सध्या कोरोनाचे संक्र मण असल्यामुळे उद्घाटन घेता येत नाही. पण या वर्षाच्या अखेरपर्यंत ही चारही आरोग्य कें द्र सुरू होईल.
मनोहर कुंभारे, सभापती, आरोग्य समिती

Web Title: Awaiting inauguration of four primary health centers in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.