ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:00+5:302021-05-15T04:08:00+5:30
भिवापूर : जनमाणसात पसरलेल्या गैरसमजामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षीत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा गावांना भेट ...
भिवापूर : जनमाणसात पसरलेल्या गैरसमजामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षीत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा गावांना भेट देत थेट ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून, ‘टोचाल तरच वाचाल’ असे विश्वासपूर्ण मार्गदर्शन केल्या जात आहे.
सध्या ४५ वर्षे वयोगटांवरील नागरिकांना लस दिल्या जात आहे. मात्र तालुक्यातील काही गावखेड्यात लसीबाबत गैरसमज असल्याने या वयोगटातील नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दुसरीकडे १८ वर्षांवरील वयोगटातून लसीकरणास मोठी मागणी आहे. मात्र पुरवठा कमी असल्याने यंत्रणेने अद्यापही तरुणांना लसीकरणाची संधी दिलेली नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांनी तत्काळ लस घ्यावी यासाठी प्रशासनाने जनजागृती सुरू केली आहे. प्रभारी तहसीलदार दिनेश पवार, सहायक गट विकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक कर्तव्यस्थळावर लसीकरणाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत आहे. जनजागृती करणाऱ्या पथकाने गत दोन दिवसांत सालेभट्टी (दंदे), महालगाव, चिखलापार, मालेवाडा, शिवापूर, मानोरा, सोमनाळा, जवळी, नांद आदी गावांना भेट देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यामुळे लसीकरणास मिळणारा प्रतिसाद आता वाढत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात लस घेतलेल्या नागरिकांची संख्या २० हजारांवर पोहोचली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १७ हजारांच्या जवळपास आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्या संख्या केवळ तीन हजारापर्यंत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस दुसरा डोससाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
===Photopath===
140521\img-20210513-wa0188.jpg
===Caption===
ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना प्रभारी तहसीलदार दिनेश पवार व सहायक गट विकास अधिकारी रोशनकुमार दुबे