‘पान जागे, फूल जागे’ने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:56 PM2019-02-27T23:56:32+5:302019-02-27T23:57:12+5:30
‘परिमलामध्ये कस्तुरी, का अंबरामध्ये शर्वरी, तैसी मराठी सुंदर भाषांमध्ये’, अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीचा सन्मान केला आहे, त्या जागतिक मराठी राजभाषा दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, गीतकार ग. दि. माडगूळकर व संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सूर सप्तकतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली. ‘पान जागे, फुल जागे’ या शीर्षकाने सायंटिफिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘परिमलामध्ये कस्तुरी, का अंबरामध्ये शर्वरी, तैसी मराठी सुंदर भाषांमध्ये’, अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीचा सन्मान केला आहे, त्या जागतिक मराठी राजभाषा दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, गीतकार ग. दि. माडगूळकर व संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सूर सप्तकतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली. ‘पान जागे, फुल जागे’ या शीर्षकाने सायंटिफिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची संकल्पना सुचित्रा कातरकर, संकल्पना पद्मजा सिन्हा यांची होती. यावेळी संगीत क्षेत्रातील कलाकार स्मिता जोशी, विजय देशपांडे, लेखिका वर्षा किडे-कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. गीत गायन स्पर्धेतील अंध विद्यालयाचे विजेते गायक राजेंद्र विश्वकर्मा, राकेश विश्वकर्मा, मयुरी घोडे, आर्य टेंभुर्णीकर, रितेश ताटकर तसेच युवा कलाकार मैथिली जुननकर, जयंत उमरेडकर, आयुष नवघरे, साक्षी बनसोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायिका स्मिता जोशी, ज्येष्ठ साहित्यिक शामकांत कुळकर्णी, प्रतापराव डोके, संगीत स्पर्धेचे परीक्षक विजय देशपांडे, चित्रकार नितीन जुनघरे, प्रा. पद्मजा सिन्हा उपस्थित होते. यावेळी स्वरगंध संस्थेचे संचालक गायक अरुण ओझरकर, वादक कलावंत अभिजित भुस्कुटे, गायिका संगीता भगत, अर्चना उचके यांना सन्मानित करण्यात आले. कवयित्री उज्ज्वला अंधारे यांच्या कविता वाचनासह शोभा दोडके यांच्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘घन घन माला नभी दाटल्या’ या गीतावरील हे सुखद प्रतिभा दर्शन होते. यानंतर मराठी भावगीत, चित्रपट गीत, अभंग, लावण्या तसेच मराठी राष्ट्रभक्ती गीतांचे सादरीकरण झाले. ‘अनामवीरा..’ या गीतासह शहिद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारी २७ गीते गायकांनी सादर केली. ‘तुझे गीत गाण्यासाठी..’, ‘सखी मंद झाल्या तारका’, धुंदी कळ्यांना’ अशी ही गीते होती. मुकुल पांडे, अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, निसर्गराज, अरुण ओझरकर, अपूर्व मासोदकर, विजय देशपांडे, मोहन पांडे, कुमार केळकर, आदित्य फडके, पद्मजा सिन्हा, प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, ऋचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, फाल्गुनी कुर्झेकर, अनुजा जोशी, दीपाली पनके, सुजाता पाटील हे सहभागी गायक होते. परिमल जोशी, पंकज यादव, आशिष घाटे, रवी सातफळे, महेंद्र वाटोळकर, निशिकांत देशमुख, तुषार विघ्ने, आर्या देशपांडे हे सहवादक होते. संचालन शुभांगी रायलु यांनी केले.