दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:50 AM2019-04-19T00:50:12+5:302019-04-19T00:51:14+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी मुख्यालयातील आणि विभागातील २० अधिकारी १४१ कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. याशिवाय सुनील सिंह सोईन यांच्यातर्फे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी वाणिज्य, कार्मिक, सिग्नल अॅन्ड दुरसंचार, यांत्रिक, विद्युत, आरोग्य, सुरक्षा, भंडार, लेखा, राजभाषा आदी विभागांना शिल्ड प्रदान केले. विभागाला बांधकामाच्या क्षेत्रात दक्षता शिल्ड देण्यात आले. या सर्व शिल्ड महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांच्या हस्ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भारतीय रेल्वेत सर्वाधिक जास्त उत्पन्न करणारे झोन असून झोनने यादृष्टीने चांगले प्रदर्शन करून २०१८-१९ मध्ये एक रेकॉर्ड कायम केला आहे. नागपूर विभागाने उल्लेखनीय कामगिरी बजावून समग्र दक्षता शिल्ड मिळवून सर्व विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी याचे श्रेय विभागातील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहे. विभााग रेल्वेगाड्यांचे चांगले संचालन आणि प्रवाशांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.