काेराेना संक्रमणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:26+5:302021-03-24T04:08:26+5:30

खापा : जिल्हा माहिती कार्यालय नागपूरच्या वतीने वाकाेडी (ता. सावनेर) येथे कला पथकाच्या माध्यमातून काेराेना संक्रमण व विविध शासकीय ...

Awareness about carina infection | काेराेना संक्रमणाबाबत जनजागृती

काेराेना संक्रमणाबाबत जनजागृती

Next

खापा : जिल्हा माहिती कार्यालय नागपूरच्या वतीने वाकाेडी (ता. सावनेर) येथे कला पथकाच्या माध्यमातून काेराेना संक्रमण व विविध शासकीय याेजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती अभियानात वाकाेडी येथील माँ शारदा सांस्कृतिक लाेककला मंचचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले हाेते. यावेळी कला पथकातील सदस्यांनी काेराेनाचे संक्रमण, ते राेखण्यासाठी व त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययाेजना, काेराेना लसीकरण यासह शासनाच्या विविध आराेग्यविषयक याेजना व अनुदानाबाबत जनजागृती केली. या कला पथकामध्ये यादवराव कान्होलकर, लीना चिमोटे, प्रभाकर बोरकर, ज्ञानेश्वर चौधरी, किशोर शेंडे, आयुष कान्होलकर, शेषराव नवले, विजय निस्ताने, महेंद्र वाहणे आदी लाेककलाकारांचा समावेश हाेता. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी माेठ्या संख्येने हजेरी लावली हाेती. कार्यक्रमादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले हाेते.

Web Title: Awareness about carina infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.