अल्पसंख्यक समाजात लसीकरणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:45+5:302021-06-18T04:07:45+5:30

नागपूर : अल्पसंख्यक समाजामध्ये कोविड-१९ लसीकरणासंदर्भात जनजागृती व लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने नुकताच महापालिका आणि सेंटर फॉर सोशल रिसर्च ...

Awareness about vaccination in minority communities | अल्पसंख्यक समाजात लसीकरणाबाबत जनजागृती

अल्पसंख्यक समाजात लसीकरणाबाबत जनजागृती

Next

नागपूर : अल्पसंख्यक समाजामध्ये कोविड-१९ लसीकरणासंदर्भात जनजागृती व लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने नुकताच महापालिका आणि सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड एम्पॉवरमेंटच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात जनजागृती कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय वक्ते मौलाना हजरत आलमगीर अशरफ यांनी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या समज-गैरसमजावर प्रकाश टाकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि कोविडला हद्दपार करण्यासाठी, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता व्यक्त केली. कोरोना काळात काही मुस्लीम स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी मोलाचे कार्य केले आहे,जमाते इस्लामी, आसरा आणि प्यारे खान यांनी दिलेल्या सेवेचा आवर्जून उल्लेख केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण ही काळाची गरज असून प्रत्येकाने लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद यांनी यावेळी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.

सेवानिवृत्त उपायुक्त अब्दुल रऊफ शेख यांनी संचालन केले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहायक महाव्यवस्थापक वाहीद शेख, आफताब खान, इंजिनिअर हमीद कुरेशी, सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मुश्ताक कुरेशी, वेकोलिचे माजी महाव्यवस्थापक गुलाम कादीर, ॲड. कुतुब जाफर, अशरफ अली, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिक खान,डॉ. दीपांकर भिवगडे, एएमओ डॉ. मोहम्मद साजिद, यांच्यासह सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड एम्पॉवरमेंटचे सदस्य, मशिदीतील इमाम, मुस्लीम विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Web Title: Awareness about vaccination in minority communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.