वायुसेनेसाठी सजगता व सतर्कता महत्त्वाची ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:47+5:302021-08-14T04:12:47+5:30
नागपूर : वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदाैरिया यांनी नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करीत सुरक्षेच्या नवीन आव्हानांचा ...
नागपूर : वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदाैरिया यांनी नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करीत सुरक्षेच्या नवीन आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी वायुसेनेने सजग आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचा इशारा दिला. नागपुरात मेंटेनन्स कमानच्या कमांडरच्या संमेलनात वायुसेना प्रमुख बाेलत हाेते.
वायुसेना प्रमुख भदाैरिया यांनी यावेळी अनेक बाबी अधाेरेखित केल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच परिवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. काेणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे, हे सुनिश्चित हाेण्याची आवश्यकता आहे. भारतीय वायुसेनेच्या विविध आणि महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यात आणि त्यासाठी याेग्य बंदाेबस्त करण्यात मेंटेनन्स कमानने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. वायुसेनेच्या आधुनिक आणि भविष्यातील तयारीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमानने याेजलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. साेबतच कठीण प्रसंगी देखभाल-दुरूस्ती व परिचालनात सुधार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्वदेशी परियाेजनांवर भर देण्याची गरज वायुसेना प्रमुखांनी यावेळी व्यक्त केली. कमांडर अधिकाऱ्यांची प्रशंसा करीत त्यांच्या प्रयत्नातून स्वदेशी व आधुनिकतेचा मंत्र आत्मसात केला आहे. ज्यामुळे मेंटेनन्स कमान भविष्यातील एकीकृत कारवायांसाठी देखभाल-दुरुस्ती व साहित्याची व्यवस्था करण्यात आणि साधनसंपन्न संस्थेच्या रूपात कार्य करीत राहील.
नागपूरच्या मेंटेनन्स कमान मुख्यालयात दाेन दिवसीय संमेलनाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी कमांडअंतर्गत बेस रिपेअर डेपाे, साधनसामग्री डेपाे, इतर स्टेशन आणि विविध विभागांचे कमांडर उपस्थित हाेते. एअर मार्शल शशिकर चाैधरी यांनी एअर चीफ मार्शल भदाैरिया यांचे स्वागत केले. वायुसेना प्रमुखांनी सध्या सुरू असलेल्या कमांडच्या याेजनांचा आढावा घेतला तसेच भविष्यातील याेजना व उपक्रमांबाबतही माहिती घेतली.