‘टाेचाल तर वाचाल’ लसीकरणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:17+5:302021-06-23T04:07:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : जनमानसात लसीबाबत गैरसमज कायम आहे. यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तहसीलदार ...

Awareness of vaccination | ‘टाेचाल तर वाचाल’ लसीकरणाचा जागर

‘टाेचाल तर वाचाल’ लसीकरणाचा जागर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : जनमानसात लसीबाबत गैरसमज कायम आहे. यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे व भिवापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जाेबी जाॅर्ज यांच्या संकल्पनेतून ‘टाेचाल तर वाचाल’ या पथनाट्याचे गावागावात सादरीकरण केले जात आहे. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अभियानातून लसीकरणाचा जागर करीत आहेत.

शहर व ग्रामीण भागात लसीबाबत गैरसमज असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. याची दखल घेत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे व अधिकाऱ्यांनी जनजागृतीची मोहीम राबविली. मात्र त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तहसील कार्यालय व भिवापूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावागावात जाऊन पथनाट्याचे सादरीकरण सुरू केले आहे. ‘टोचाल तर वाचाल’ पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर, तात्काळ कोविड तपासणी व उपचार आदीबाबत नियमावलीचे पालन केल्यास गाव कोरोनामुक्त होऊ शकते, असे दृश्य रेखाटल्या गेले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मोतीराज चव्हाण, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अश्विनी कडू यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक ईशा मामीडवार, पूजा बोडे, गायत्री गोंगल, गौरी दरेकर, प्राची मानकर, पायल मेश्राम, प्रदीप कापगते, राजकुमार ढोणे, पवन रामटेके आदींचा यात समावेश आहे.

....

१३ गावात जनजागृती

तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी मंगळवारी(दि.२२) पथनाट्य सादरीकरणास भिवापूर येथे हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. आझाद चौक, रामधन चौक, आंभोरा रोड, दिघोरा रोड, धर्मापूर परिसरात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी राकेश त्रिपाठी, नगर पंचायत कर्मचारी दुगदेव तिमांडे, अशोक लांजेवार, धनंजय केंद्रे, वसंता धारणे उपस्थित होते. भिवापूरसह तालुक्यातील तास, कारगाव, नक्षी, जवळी, नांद, बेसूर, मालेवाडा, मागंरुड, भगवानपूर, सोमनाळा, पाहमी (चिचाळा) महालगाव आदी गावात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

Web Title: Awareness of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.