आदिवासी भागात लसीकरणाची गोंडी भाषेतून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:24+5:302021-06-02T04:07:24+5:30

जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. लसीकरणानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याने ...

Awareness of vaccination in tribal areas through Gondi language | आदिवासी भागात लसीकरणाची गोंडी भाषेतून जनजागृती

आदिवासी भागात लसीकरणाची गोंडी भाषेतून जनजागृती

Next

जिल्ह्यातील आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. लसीकरणानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा गाजला होता. या भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काँग्रेसच्या सदस्या शांता कुमरे यांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले, आम्ही या भागात विशेष मोहीम राबवित आहोत. अधिकारी, पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांमार्फत ही मोहीम राबविली जात आहे. यात अनेक गावांना तसेच ग्रामपंचायतींना भेटी दिल्या जात आहेत. शांता कुमरे यांच्या सहकार्याने आम्ही आदिवासी जनतेशी संवाद साधत आहोत. त्याद्वारे लसीकरण तसेच एकंदरीत कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील काही समाजकार्य महाविद्यालयांच्या सहकार्याने आम्ही काही पथनाट्येसुद्धा आयोजित करणार आहोत. आदिवासींशी योग्यरित्या संवाद साधता यावा यासाठी मराठी व हिंदीखेरीज गोंडी भाषेतसुद्धा ही पथनाट्ये सादर केली जातील.

Web Title: Awareness of vaccination in tribal areas through Gondi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.