अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:02 AM2018-07-31T11:02:17+5:302018-07-31T11:02:55+5:30

अयोध्येच्या वादातीत जागेवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य वर्षाच्या शेवटी सुरू करण्यात येईल, असा दावा श्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी करून राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

In Ayodhya, construction of Ram Mandir will start at the end of the year | अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

Next
ठळक मुद्देश्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांचा दावा

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येच्या वादातीत जागेवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य वर्षाच्या शेवटी सुरू करण्यात येईल, असा दावा श्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी करून राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
महंत जनमेजय शरण खासगी कारणांनी शहरात आले होते. दरम्यान, लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केला. भाजपा व संघाच्या नेत्यांकडून मंदिर निर्माणसंदर्भातील भूमिका व सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून मंदिराच्या निर्माणसंदर्भातील भूमिका जाणण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात ते स्पष्ट म्हणाले की, नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात मंदिराचे निर्माणकार्य सुरू होईल. प्रयाग येथे होणाऱ्या कुंभमेळाव्याच्या पूर्वी मंदिराचा पाया रचण्याचा शुभारंभ निश्चित आहे. ते म्हणाले की, हे काम संत व धर्मगुरूंच्या आशीर्वादाने होईल. शासन व प्रशासनाची भूमिका बाहेरून सहकार्याची राहील. मंदिराच्या निर्माणाला लागणाऱ्या वेळेसंदर्भात ते म्हणाले की, हे इंजिनीअर सांगू शकेल.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल
महंत जनमेजय शरण यांनी दावा केला की, वर्षाच्या शेवटपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश येऊन जाईल. त्यांचा विश्वास आहे की, मंदिराच्या बाजूनेच निर्णय होईल, कारण हे काम जनभावनेचे आहे. जनताजनार्दन आहे आणि मंदिराचे कार्य जनार्दना(देव)चे आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल, यात काही शंका नाही.

नेत्यांजवळ पर्याय नाही
अयोध्येचे राममंदिर राजकारणाचा मुद्दा बनले आहे, यावर बोलताना महंत म्हणाले की, आता नेत्यांजवळ दुसरा विकल्प नाही. त्यांना मंदिर निर्माण करावे लागेल. बरेच राजकीय नेते आतापर्यंत मंदिराच्या निर्माण कार्याकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु संतांनी असा दबाव वाढविला आहे की, राजकीय नेत्यांना मंदिराचा मुद्दा घ्यावाच लागेल. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारचे मंत्री अयोध्येत येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: पाच ते सहावेळा अयोध्येत आले.

Web Title: In Ayodhya, construction of Ram Mandir will start at the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.