आयुर्वेद डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीचा आधार घेऊ नये - नितीन गडकरी

By सुमेध वाघमार | Published: November 5, 2023 04:18 PM2023-11-05T16:18:01+5:302023-11-05T16:19:44+5:30

आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आयुवेर्दाचा इतिहास उलगडणारे व आयुर्वेदाचा संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते.

Ayurveda doctors should not rely on allopathy - Nitin Gadkari | आयुर्वेद डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीचा आधार घेऊ नये - नितीन गडकरी

आयुर्वेद डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीचा आधार घेऊ नये - नितीन गडकरी

नागपूर : आयुवेर्दाला केवळ देशात नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे. आयुर्वेद डॉक्टरांनी केवळ आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करावी, त्यांनी अ‍ॅलोपॅथीचा आधार घेऊन नये. कारण आयुर्वेदावर लोकांचा विश्वास आहे, तो सार्थ करून आयुवेर्दाचा प्रचार करणे आवश्यक आहे.  आयुर्वेद क्षेत्रात व्रतस्थपणे करणारे आयुर्वेद डॉक्टर ही आपली शक्ती ठरणे आवश्यक आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. 

‘क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान’च्यावतीने आठव्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून रविवारी रथयात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी आपल्या व्हिडीओमधून हा संदेश दिला. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, क्रीडा चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विजय मुनिश्वर, महाराष्ट्राची पहिली बॉक्सर अल्फिया पठाण, सायकलपटू अमीत समर्थ, ईश्वर देशमुख कॉलेजचे प्राचार्य एस. नायडू, डॉ. पोतदार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्या आली. यावेळी क्षेत्रीय आयुवेदिक अनुसंधान संस्थेचे सहायक संचालक डॉ. मिलिंद सुर्यवंशी उपस्थित होते. 

रॅलीमधून उलगडला आयुर्वेदाचा संदेश

आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आयुवेर्दाचा इतिहास उलगडणारे व आयुर्वेदाचा संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते. याशिवाय ई-रिक्षा नीमा, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट, बैद्यनाथ, केडीके आयुर्वेदिक कॉलेज, श्री आयुर्वेद कॉलेज, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, आरोग्य भारती, विज्ञान भारती, नीरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन, लायन्स क्लब, आदर्श फार्मसी कॉलेज, बेटीयां शक्ती फाउंडेशन, पुलक मंच, अमर स्वरूप फाऊंडेशनचे विद्यार्थी व सदस्य रॅलीत सहभाग झाले होते. पुरस्काराचे वितरण आ. कृष्णा खोपडे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, दत्ता मेघे आयुर्वेद कॉलेजचे डॉ. मनीष देशमुख, नीरीचे डॉ. कृष्णमूर्ती व डॉ. मिलिंद सुर्यवंशी उपस्थित होते.  यावेळी ज्युपिटर आयुर्वेद कॉलेजला प्रथम, भाऊसाहेब मुळक केडीके  कॉलेज बुटीबोरीला द्वितीय तर दत्ता मेघे कॉलेज वानाडोंगरीला तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Ayurveda doctors should not rely on allopathy - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.