आयुर्वेद ही एक जीवनशैलीच
By admin | Published: October 21, 2014 12:57 AM2014-10-21T00:57:35+5:302014-10-21T00:57:35+5:30
आयुर्वेद ही एक जीवनशैलीच असल्याचे प्रतिपादन डॉ. राम ज्योतिषी यांनी येथे केले. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा.लि.तर्फे श्री धन्वंतरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन बैद्यनाथ आयुर्वेदच्या ग्रेट नाग
राम ज्योतिषी यांचे प्रतिपादन : बैद्यनाथतर्फे धन्वंतरी जयंती कार्यक्रम
नागपूर : आयुर्वेद ही एक जीवनशैलीच असल्याचे प्रतिपादन डॉ. राम ज्योतिषी यांनी येथे केले. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा.लि.तर्फे श्री धन्वंतरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन बैद्यनाथ आयुर्वेदच्या ग्रेट नाग रोड येथील प्रांगणात सोमवारी पार पडले.
डॉ. राम ज्योतिषी हे विज्ञान भारती, विदर्भाचे अध्यक्ष आणि वर्ल्ड आयुर्वेद फाऊंडेशनचे ट्रस्टी आहेत. मंचावर श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवनचे सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, महाव्यवस्थापक भारतभूषण श्रीखंडे आणि सत्कारमूर्ती भोपाळचे वैद्य उमेश शुक्ला, पुणे येथील वैद्य वैभव मेहता, जयकुमार तम्हाने व स्वाती मोहिते, वैद्य रंजना वाघ्रळकर आणि उज्जैनचे वैद्य विनोदकुमार वैरागी होते.
ज्योतिषी यांनी आयुर्वेदातील बारीकसारीक बाबींची माहिती दिली. प्रारंभी सुरेश शर्मा यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला आणि शाल-श्रीफळ, रौप्य चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन स्वागत केले.
कार्यक्रमात मुख्य फॅक्टरी व्यवस्थापक राजेश ठाकरे, विपणन व्यवस्थापक सत्यदेव शर्मा, उपप्रधान वैद्य प्रतीन पट्टलवार यांच्यासह भावना शर्मा, वैद्य वीणा देव, व्यवस्थापक प्रमोद लुटे यांच्याह अनेक वैद्य आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)