नाही व्हायचे आयुर्वेदिक डॉक्टर

By admin | Published: October 29, 2015 03:10 AM2015-10-29T03:10:32+5:302015-10-29T03:10:32+5:30

आयुर्वेदिक आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा खाली असणे ही सामान्य बाब आहे.

Ayurvedic doctors do not want to | नाही व्हायचे आयुर्वेदिक डॉक्टर

नाही व्हायचे आयुर्वेदिक डॉक्टर

Next

१०० पैकी ९९ जागा रिक्त : डीएमईआरने जारी केले प्रवेशासाठी नोटिफिकेशन
मुस्तफा मुनीर नागपूर
आयुर्वेदिक आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा खाली असणे ही सामान्य बाब आहे. परंतु १०० पैकी ९९ जागा रिक्त असतील आणि केवळ एकच विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असेल तर आश्चर्यकारक घटना नक्कीच आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्यानुसार नागपुरातील शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमधील १०० पैकी ९९ जागा रिक्त आहेत. आतापर्यंत केवळ एकाच विद्यार्थ्याने बीएएमएस अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

डीएमईआरने यासंदर्भात आपल्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जारी केले असून या जागांवरील प्रवेशासाठी २८ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरूकरण्याचे आदेश बजावले आहेत. यासंदर्भात आयुर्वेदिक कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्केवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा लोकमतने प्रयत्न केला, परंतु कुणीच फोन उचलला नाही. कार्यालयाच्या दूरध्वनीवरसुद्धा कुठलेही उत्तर मिळाले नाही.
मेडिकलमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसला वगळले तर सर्व अभ्यासक्रमाची परिस्थिती दयनीय आहे. खासगी महाविद्यालये तर दूरच राहिलीच शासकीय महाविद्यालयांनासुद्धा विद्यार्थी मिळत नाहीत. डीएमईआरच्या नोटिफिकेशननुसार राज्यातील २० आयुर्वेदिक महाविद्यालयात शासकीय कोट्यातील ११२० जागांपैकी ६२० जागा रिक्त आहेत. त्याचप्रकारे बीयुएमएसच्या तीन कॉलेजमधील शासकीय कोट्यातील ७५ पैकी ३२ जागा रिक्त आहेत. बीपीटीएचच्या पाच कॉलेजमधील शासकीय कोट्यातील ९० पैकी २९ जागा रिक्त आहेत. बीओटीएच अभ्यासक्रमाच्या चार कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातील ९० जागा आहेत. त्यापैकी ५९ जागा रिक्त आहेत. बीएएसएलपीचे राज्यात दोनच कॉलेज आहेत.
यात शासकीय कोट्यातील २५ पैकी १८ जागा रिक्त आहेत. त्याचप्रकारे बीएससी नर्सिंगचे राज्यात चार कॉलेज आहेत. यात शासकीय कोट्यातील २०० पैकी १०७ जागा रिक्त आहेत.

नागपुरात शासकीय कोट्यातील रिक्त जागा
डीएमईआरच्या नोटिफिकेशननुसार नागपुरातील दोन आयुर्वेदिक कॉलेजमधील जीएमसी आणि एसएसीमध्ये शासकीय कोट्यातील १७० पैकी १३४ जागा रिक्त आहेत. जीएमसी नागपूरमध्ये बीपीटीएचच्या ३० पैकी १३ जागा, बीओटीएचच्या ३० पैकी २३ जागा, आणि बीएससी नर्सिंगच्या ५० पैकी २३ जागा रिक्त आहेत.

Web Title: Ayurvedic doctors do not want to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.