मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:18 IST2024-06-22T15:15:51+5:302024-06-22T15:18:17+5:30
Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले
Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आरक्षणावरुन बबनराव तायवाडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही समाजाची मागणी आहे, असंही तायवाडे म्हणाले.
शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका
"महाज्योतीला लोकसंख्येनुसार जास्तीत जात निधी द्यायला पाहिजे,युवक आणि सामान्य माणसाचे भले होईल. ओबीसी हॉस्टेल सुरू झाले नाही याचीही चर्चा व्हायला पाहिजे,बिहारमध्ये जशी जनगणना झाली तशीच जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी बाध्य करावे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले.
जरांगे पाटलांवर टीका
"मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांवर बोलत आहेत. जरांगे खालच्या स्तरावर भाषा वापरतात. त्यांची उंची आहे का?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी केला. ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात,येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते हे आम्ही दाखवून देऊ. पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आता आमची शक्ती दाखवू, असंही तायवाडे म्हणाले.
कुणबी नोंदीबाबत बोलताना तायवाडे म्हणाले, ५४ लाख किंवा ५७ लाखांचा आकडा सांगत आहेत, यात ५७ लाखात ९५ टक्के नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलन आधीच्या आहेत. सरकारने श्वेत पत्र जाहीर करावे, की जरांगे यांच्या आंदोलनपूर्वी आणि आंदोलन नंतर किती नोंदी झाली,मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले.
आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले , या ट्विटवर बोलताना तायवाडे म्हणाले, महाराष्ट्राला माहीत आहे की ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आम्ही आंदोलने करीत असतो. आमचे सर्व प्रश्न संविधानिक आणि शांततेत पूर्ण केले, आमच्या संघटनेने ४८ जीआर काढले आहेत. सरकारसोबत चर्चा करतो, मुद्दे मांडतो,अमच्याबाबतही कोणी बोलावे, ट्विट करावे, असंही तायवाडे म्हणाले.